A bullet that will keep soldiers alive forever; U.S. Department of Defense begins testing

या गोळीमुळे एनएडी (निकोटीनामाईज एडेनीन डायन्युक्लीओटाईड) ची पातळी वाढते. त्यामुळे अंगावरची सूज, नर्व्हस सिस्टीम जीर्ण होणे थांबविता येते. पेशी पुन्हा जवान होतात. या गोळीत वापरले गेलेले घटक पदार्थ खाण्याच्या पदार्थातून घेतले गेले आहेत. या पदार्थात पोषक आणि औषधी गुण भरपूर आहेत.

    वॉशिंग्टन : अमेरिकन सेनेने त्यांच्या सैनिकांवर एका खास गोळीच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. या गोळीमुळे सैनिकांचे वय वाढण्याची प्रकिया कमी होणार आहे शिवाय त्यांच्या जखमा लवकर भरून येणार आहेत. स्पेशल ऑपरेशन्स कमांड (सिकोम)ने त्यासाठी ही खास अँटी एजिंग गोळी तयार केली आहे. अमेरिकेच्या रक्षा मंत्रालयाने सैनिकांची क्षमता वाढविण्यासाठी राबविलेल्या पेंटागॉन प्रोजेक्टचा हा एक भाग आहे असे समजते. या अँटीएजिंग गोळीमुळे सैनिकांच्या कामगिरीत अधिक सुधारणा होणार आहे.

    या गोळीमुळे एनएडी (निकोटीनामाईज एडेनीन डायन्युक्लीओटाईड) ची पातळी वाढते. त्यामुळे अंगावरची सूज, नर्व्हस सिस्टीम जीर्ण होणे थांबविता येते. पेशी पुन्हा जवान होतात. या गोळीत वापरले गेलेले घटक पदार्थ खाण्याच्या पदार्थातून घेतले गेले आहेत. या पदार्थात पोषक आणि औषधी गुण भरपूर आहेत.

    सिकोमचे प्रवक्ते टीम हॉकीन्स म्हणाले या गोळ्या देण्याचा उद्देश सेना मिशन तयारीसाठी सैनिकांची क्षमता वाढविणे हा आहे. वाढत्या वयात ही क्षमता कमी होते. या गोळ्या घेतल्याने सैनिकांच्या जखमा लवकर भरून येतात, मानसिक स्वास्थ्य सुधारते आणि सैनिकांना संपूर्ण करियर भर कामगिरी खालावण्याची भीती रहात नाही. अर्थात या गोळ्या सैनिकांप्रमाणे सर्वसामान्य नागरिक सुद्धा घेऊ शकतात असे स्पष्ट केले गेले आहे.