पगार घ्या, घरी राहा, आराम करा ! या कंपनीच्या धोरणामुळे कर्मचारी खुश

या कंपनीनं कर्मचाऱ्यांना चक्क पगारी सुट्टी देण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीने एकाच वेळी सर्व कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी देऊ केलीय आणि ती घेणं बंधनकारकही केलंय. तुम्ही पगार घ्या, एक आठवडा घरी राहा, आराम करा, खा, प्या, मजा करा, तुमचं आयुष्य तुम्हाला हवं तसं जगा, असं या कंपनीनं कर्मचाऱ्यांना सांगितलंय. त्यामुळं कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. 

    गेल्या वर्षी जगात दाखल झालेला कोरोना आणि त्यानंतरचं लॉकडाऊन यांचा अनेकांच्या नोकऱ्यांवर आणि व्यवसायावर परिणाम झाला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, धंदे बुडाले, कामगार देशोधडीला लागले. लॉकडाऊनमध्ये नुकसान होत  असल्याने अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला. या सगळ्यात एक कंपनी मात्र वेगळी ठरलीय.

    या कंपनीनं कर्मचाऱ्यांना चक्क पगारी सुट्टी देण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीने एकाच वेळी सर्व कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी देऊ केलीय आणि ती घेणं बंधनकारकही केलंय. तुम्ही पगार घ्या, एक आठवडा घरी राहा, आराम करा, खा, प्या, मजा करा, तुमचं आयुष्य तुम्हाला हवं तसं जगा, असं या कंपनीनं कर्मचाऱ्यांना सांगितलंय. त्यामुळं कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय.

    या कंपनीचं नाव आहे लिंक्डइन. (LinkedIn) ही मायक्रोसॉफ्टची सोशल नेटवर्किंग कंपनी आहे. कर्मचाऱ्यांवर येणारा कामाचा ताण पाहता, तो कमी व्हावा आणि त्यांच्यावरचं मानसिक दडपण निघून जाऊन कर्मचारी ताजेतवाने व्हावेत, या उद्देशानं कंपनीनं हा निर्णय घेतलाय. एकूण सात दिवसांची सुट्टी सर्वांना देण्यात आलीय आणि या दिवसांतील कामाचे पूर्ण पगार त्यांना मिळणार आहे.

    ५ एप्रिलपासून ही सुट्टी सुरू झालीय. सध्या कंपनीचे १५,९०० कर्मचारी सुट्टीवर आहेत. सध्याच्या काळात वेळ ही सर्वात बहुमूल्य गोष्ट आहे. याचा विचार करूनच हा निर्णय घेतल्याचं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय.