Two silver wedding rings linked together
Two silver wedding rings linked together

कोरोना झाला तरी आयुष्य संपत नाही, हे कॅलिफोर्नियातील एका कपलनं सिद्ध करून दाखवलंय. या जोडप्याचं लग्न ठरलं होतं. तारीख निश्चित झाली होती. सगळं काही सेट होतं. पण लग्नाला तीन दिवस उरले असताना वधूला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. आता अशा परिस्थितीत लग्न कसं होणार, हा प्रश्न सर्वानाच पडला. पण या जोडप्यानं डोकं चालवून एक शक्कल लढवली.

सध्या कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातलाय. कोरोनावरची लस कधी येते याकडं संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. या कोरोना काळात कुठल्याही समारंभांना जाणं लोक टाळतायत. एवढंच काय, अनेकांनी आपलं लग्नदेखील पोस्टपोन केलंय.

कोरोना झाला तरी आयुष्य संपत नाही, हे कॅलिफोर्नियातील एका कपलनं सिद्ध करून दाखवलंय. या जोडप्याचं लग्न ठरलं होतं. तारीख निश्चित झाली होती. सगळं काही सेट होतं. पण लग्नाला तीन दिवस उरले असताना वधूला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. आता अशा परिस्थितीत लग्न कसं होणार, हा प्रश्न सर्वानाच पडला. पण या जोडप्यानं डोकं चालवून एक शक्कल लढवली.

इच्छा असेल तर मार्ग सापडतो, ही म्हण या जोडप्यानं खरी करून दाखवली. कोरोनामुळं लग्नासाठी एकत्र येणं शक्य नव्हतं. तसं झालं तर तो निर्णय आत्मघातकीच ठरू शकला असता. वधूच्या कोरोनाचा संसर्ग वराला तर झाला असताच, मात्र इतर वऱ्हाडी मंडळींनाही त्याचा फटका बसला असता. शिवाय वधूला कोरोना झाल्याचं कळल्यामुळं या विवाहाकडं अनेकांनी पाठच फिरवली असती.

मात्र या जोडप्याला यातलं काहीच होऊ द्यायचं नव्हतं. ऑनलाईन लग्न करणं हेदेखील त्यांना मान्य नव्हतं. मग त्यांनी एका दोरीचा वापर करून लग्न करायचं नक्की केलं. वधू तिच्या घराच्या गच्चीत आली. वर खालच्या मजल्यावर उभा राहिला. दोघांनीही आवश्यक सोशल डिस्टन्सपेक्षा जास्त अंतर ठेवलं. वधूनं तिच्या कंबरेला दोरी बांधली आणि त्याचं दुसरं टोक वराकडे दिलं. मग वरानेदेखील ती दोरी आपल्या कंबरेला गुंडाळली.

नात्यांचे हे धागे असे दोरीच्या साहाय्याने जोडले गेले. या जोडप्याची ही अनोखी आयडिया पाहून वऱ्हाडी मंडळीदेखील खुश झाली आणि जोरदार सेलिब्रेशनसह वधू आणि वर विवाहबंधनात अडकले. त्यांच्यातील ही दोरी आता वधूचा क्वारंटाईन पिरियड संपल्यानंतर दूर होईल आणि ते कायमचे एकत्र येतील.