समुद्राच्या मध्यभागी उडाला आगीचा भडका; व्हिडीओ व्हायरल

तापर्यंत जमिनीवर कित्येक ठिकाणी घटना ऐकल्या किंवा बघितल्या असतील पण भर समुद्रा आग लागल्याची घटना क्वचितच ऐकली असेल. अशीच एक घटना आता समोर आली आहे. मेक्सिकोच्या युकाटान प्रायद्वीपच्या पश्चिमेला असलेल्या समुद्रात ही आग लागली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

    मेक्सिको : आतापर्यंत जमिनीवर कित्येक ठिकाणी घटना ऐकल्या किंवा बघितल्या असतील पण भर समुद्रा आग लागल्याची घटना क्वचितच ऐकली असेल. अशीच एक घटना आता समोर आली आहे.

    मेक्सिकोच्या युकाटान प्रायद्वीपच्या पश्चिमेला असलेल्या समुद्रात ही आग लागली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या दरम्यान प्रायद्वीपच्या पश्चिमेच्या बाजूला समुद्रात अचानक मोठी आग लागली. त्या आगीच्या आवाजानं समुद्र किनाऱ्यावर देखील मोठा हादरा बसला. पेमेक्स ऑइल प्लॅटफॉर्मपासून काही अंतरावर ही आग लागली होती. त्यानंतर आग विझवण्याचा प्रयत्न केला गेला.

    दरम्यान ही आग विझवण्यासाठी 5 तासाहून अधिक वेळ लागाल, अशी माहिती मेक्सिकोची सरकारी तेल कंपनी पेमेक्सानं दिली आहे. पेमेक्सच्या प्रमुख कु मालूब जाप ऑईल डेव्हलपमेंटच्या प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या पाण्याखालून ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. पाइपलाइनमधून ही आग सुरू झाली, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे. ही आग गोलाकार स्थितीत लागल्यानं, या आगीला स्थानिकांनी आय ऑफ फायर म्हणजेच आगीचा डोळा असं नाव दिलं आहे.

    तसेचं , कंपनीनं या आगीचं कारण पाण्यातील पाइपलाइनमधून झालेली गॅस गळतीअसल्याचं सांगितलं आहे. या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. तसंच गॅस गळतीमुळे प्रकल्पाच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पादनावरही परिणाम झाला नाही. मोठी जहाजं आणि हेलिकाॅप्टरच्या मदतीनं ही आग विझवण्यास अखेर यश आलं आहे.