मदतीचा हात ! कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियन क्रिकेट नियामक मंडळाकडून ५० हजार डॉलर्सची मदत

“भारतीय आणि ऑस्ट्रेलियन लोकांमध्ये विशेष मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दोन्ही देशातील लोकांना क्रिकेटबद्दल असणारं प्रेम या आपल्या मैत्रीच्या केंद्रस्थानी आहे. भारतातील आमच्या अनेक बंधू भगिनींना करोनाचा संकटाचा सामना करताना येणाऱ्या अडचणींबद्दल ऐकून खूपच दु:ख होत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसलेल्या सर्वांसोबत आमच्या सदिच्छा आहेत,” असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हंगामी कार्यकारी अधिकारी असणाऱ्या निक हॉकले यांनी जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

    भारतामधील सध्याची कोरोना परिस्थिती चिंताजनक आहे याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन क्रिकेट नियामक मंडळाने भारताला कोरोना संकटाच्या काळामध्ये मदत करण्यासाठी हात पुढे केलाय. क्रिकेट ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन आणि युनिसेफ ऑस्ट्रेलियाने एकत्र येऊन भारतासाठी ५० हजार अमेरिकन डॉलर्सची (जवळजवळ ३७ लाख रुपये) मदत जाहीर केली होती. सध्या भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सुरु असणाऱ्या घडामोडींमुळे आम्हाला खूप दु:ख होत आहे. भारतासोबत चांगले मैत्रीपूर्ण संबंध असणारा ऑस्ट्रेलिया या संकटकाळात भारतासोबत आहे असं या संस्थांनी स्पष्ट केलं आहे.

    युनिसेफ ऑस्ट्रेलियाने भारतामधील ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात काम करताना ऑक्सिजन निर्माण करणारी यंत्रणा भारतीय रुग्णालयांमध्ये उभारण्यासाठी सहकार्य करणार असल्याचं सांगितलं आहे. कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्यांमधील चाचण्या वाढवण्यासाठी चाचण्यासंदर्भातील साहित्य तसेच लसीकरणासाठी आवश्यक असणारं साहित्य युनिसेफ ऑस्ट्रेलियाकडून पुरवलं जाणार आहे.ऑस्ट्रेलियन नागरिकांनाही त्यांनी संकटाच्या काळामध्ये भारताला मदत करण्यासाठी पुढाकार घेत जमेल ती रक्कम मदत म्हणून देण्याचं आवाहन केलं आहे. ही मदत देण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक लिंकही उपलब्ध करुन दिलीय.