बांग्लादेशमध्ये मोठी दुर्घटना : सहा मजली इमारतीला लागली भीषण आग, ४० जणांचा मृत्यू

६ मजली फॅक्टरीमध्ये भीषण आग लागल्याने ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, ३० जण जखमी झाले आहेत. ही भीषण आग फॅक्टरीच्या वरच्या मजल्यावर लागली. इमारतीच्या आत अजूनही काही लोक अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

    ढाका: बांग्लादेशची राजधानी ढाकामध्ये शुक्रवारी भीषण दुर्घटना घडली आहे. येथील एका ६ मजली फॅक्टरीमध्ये भीषण आग लागल्याने ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, ३० जण जखमी झाले आहेत. ही भीषण आग फॅक्टरीच्या वरच्या मजल्यावर लागली. इमारतीच्या आत अजूनही काही लोक अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

    पोलिसांनी सांगितल्यानुसार, गुरुवारी सायंकाळी ५ वाजता रूपगंज परिसरातील फूड अँड बेवरेज फॅक्टरीमध्ये ही भीषण आग लागली. शुक्रवारी सकाळपर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता. आतापर्यंत २५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. अनेकजण जखमी असल्यामुळे मृतांच्या आकड्यात वाढ होऊ शकते. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आतील परिस्थिती स्पष्ट होईल.