A mysterious village; Where not only man but all animals are blind

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गावात जेपोटेक जमातीचे लोक राहतात. एक रहस्य असही आहे की, टिल्टेपक गावात जेव्हा बाळ जन्म घेते तेव्हा ते बाळ पूर्णपणे ठीक असते. पण जन्माच्या काही दिवसांनंतर त्याच्या डोळ्याची दृष्टी जाते. नंतर ते बाळही इतरांसारखे अंध होते. गावात राहणारे लोक यासाठी एका झाडाला जबाबदार मानतात. गावातील लोकांचे मत आहे की, लावजुएला नावाच्या एका झाडाला पाहिल्यावर मनुष्यांसोबतच पशु-पक्षी सगळेच अंध होतात. मात्र, वैज्ञानिकांना हे मान्य नाही.

    जगभरात अशा विचित्र किंवा रहस्यमय गोष्टी आहेत ज्यांबाबत वाचल्यावर एकतर त्यावर विश्वास बसायला अवघड जात नाही तर माणूस हैराण होतो. आज आम्ही तुम्हाला जगातील एका वेगळ्याच गावाबाबत सांगणार आहोत. हे जगातले असे रहस्यमय गाव आहे जिथे राहणारे लोकंच काय तर प्राणीही अंध आहेत. मेक्सिकोमधील टिल्टेपक गावाला ‘विलेज ऑफ ब्लाईंड पिपल’ म्हटले जाते. म्हणजे अंध लोकांचे गाव. या गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत येथील प्राणीही अंध आहेत. यामागे काहीतरी मोठे रहस्य असल्याचे लोक मानतात. त्यामुळे प्रत्येकाला या गावाबाबत जास्तीत जास्त माहिती मिळवायची असते.

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, गावात जेपोटेक जमातीचे लोक राहतात. एक रहस्य असही आहे की, टिल्टेपक गावात जेव्हा बाळ जन्म घेते तेव्हा ते बाळ पूर्णपणे ठीक असते. पण जन्माच्या काही दिवसांनंतर त्याच्या डोळ्याची दृष्टी जाते. नंतर ते बाळही इतरांसारखे अंध होते. गावात राहणारे लोक यासाठी एका झाडाला जबाबदार मानतात. गावातील लोकांचे मत आहे की, लावजुएला नावाच्या एका झाडाला पाहिल्यावर मनुष्यांसोबतच पशु-पक्षी सगळेच अंध होतात. मात्र, वैज्ञानिकांना हे मान्य नाही.

    वैज्ञानिकांचे मत आहे की लोकांच्या अंध होण्यामागे झाड नाही तर एक खतरनाक आणि विषारी माशी याचे कारण आहे. वैज्ञानिक सांगतात की, एका खासप्रकारची विषारी माशी चावल्यानंतर लोकांच्या डोळ्यांच्या दृष्टी जाते. गावातील सगळेच लोक झोपड्यांमध्ये राहतात. या गावात साधारण 70 झोपड्या आहेत. यात साधारण 300 लोक राहतात. हे सगळेच अंध आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या लोकांच्या झोपड्यांना खिडक्याही नाहीत. असेही मानले जाते की येथील काही लोकांच्या डोळ्यांची दृष्टी परत आली. त्यामुळे त्यांच्या मदतीने इतर लोकांना जगण्यात मदत होते.