न्यूयॉर्कमध्येही कोरोनाचा नवा म्युटेट व्हेरिएंट आढळला; तज्ज्ञांनी दिला अतिदक्षतेचा इशारा

दक्षिण आफ्रिकेनंतर आता न्यूयॉर्कमध्येही (New york) कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन (Corona new strain) दिसून आला आहे. अमेरिकेतील दोन गटांच्या शास्त्रज्ञांनी स्वतंत्र अभ्यास केला आणि या दोन्ही संशोधनात न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा हा नवा म्युटेट व्हेरिएंट (Mutate Varient) असल्याचं आढळलं आहे.

    न्यूयॉर्क (New York).  दक्षिण आफ्रिकेनंतर आता न्यूयॉर्कमध्येही (New york) कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन (Corona new strain) दिसून आला आहे. अमेरिकेतील दोन गटांच्या शास्त्रज्ञांनी स्वतंत्र अभ्यास केला आणि या दोन्ही संशोधनात न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा हा नवा म्युटेट व्हेरिएंट (Mutate Varient) असल्याचं आढळलं आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी सावध राहण्याच्या आणि खबरदारी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट गेल्या नोव्हेंबरमध्ये न्यूयॉर्क परिसरात आढळून आला होता. त्यानंतर शेजारील राज्यांमध्ये त्याचा वेगाने प्रसार झाला. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालाॅजीच्या संशोधकांनी या आठवड्यात याबाबतचे संशोधन प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट किती धोकादायक आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

    न्यूयॉर्कमधील कॅलटेक आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीमधील दोन संशोधक गटांनी या आठवड्यात पेपर प्रसिद्ध केले असून, त्यात त्यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत, त्याच्या निष्कर्षाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.