A rare flower with a very foul odor; Even animals do not go near him

वास्तविक फुल आणि सुगंध यांचे अनोखे नाते आहे. फुल म्हटले की सुगंध आलाच. परंतु, हे फुल मात्र त्याला अपवाद आहे. या फुलाचा वास सडलेल्या प्रेताप्रमाणे येतो त्यामुळे जनावरे सुद्धा त्याच्या जवळ जात नाहीत. यापूर्वी 2011 मध्ये हे फुल फुलले होते. त्यावेळी या घाणेरड्या वासाची पर्वा न करता अनेकांनी हे फुल पाहण्याचा आनंद लुटला होता.

    सॅनफ्रान्सिस्को : अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथील नर्सरीत एक अनोखे फुल उमलले आहे. हे फुल अतिशय आकर्षक आहे पण त्याची दुर्गंधी इतकी आहे की कित्येक किलोमीटर वरून हा वास येतो. ‘ कॉर्पस फ्लॉवर’ असेच या फुलाचे नाव असून ते फुलण्यासाठी 10 वर्षे लागतात.

    वास्तविक फुल आणि सुगंध यांचे अनोखे नाते आहे. फुल म्हटले की सुगंध आलाच. परंतु, हे फुल मात्र त्याला अपवाद आहे. या फुलाचा वास सडलेल्या प्रेताप्रमाणे येतो त्यामुळे जनावरे सुद्धा त्याच्या जवळ जात नाहीत. यापूर्वी 2011 मध्ये हे फुल फुलले होते. त्यावेळी या घाणेरड्या वासाची पर्वा न करता अनेकांनी हे फुल पाहण्याचा आनंद लुटला होता.

    यावेळी करोना मुळे ते शक्य नाही. म्हणून नर्सरी मालक सालोमन लेवा यांनी फुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वनस्पती तज्ञाच्या मते हे फुल दुर्लभ आहे. त्याची लांबी 10 ते 12 फुट इतकी असते. कळीपासून पूर्ण फुल उमलायला 10 वर्षे जावी लागतात. घाणेरड्या वासाचे असले तरी या फुलाचे सौंदर्य अद्भूत असते.