रेल्वे ट्रॅकवर थांबला ट्रक, समोरून आली ट्रेन आणि पुढे काय घडलं ते तुम्हीचं पाहा, Video तुफान व्हायरल…

ट्रेनने एका ट्रकला जोरदार धडक दिल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून अंगावर काटा येईल,असा हा व्हिडिओ आहे. अमेरिकेच्या टेक्सासमधील शहर सँट एंटोनियो येथील हा व्हिडिओ आहे. यामध्ये एक ट्रक रेल्वे रूळ ओलांडताना दिसत आहे.

    नवी दिल्ली :  रेल्वे रूळ (Train Accident) ओलांडताना नेहमी प्रवाशांनी किंवा वाहन चालकांनी काळजी घेणे गरजेचे असते. खरंतरं नियमांची पायमल्ली करून रेल्वे रूळ ओलांडणे हा खरं गुन्हा आहे. परंतु काही वाहन चालक आणि प्रवाशांच्या निष्काळजी पणामुळे त्यांना मोठ्या धक्क्याला सामोरे जावे लागते. दरम्यान, भरधाव ट्रेनने एका ट्रकला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली असून त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

    ट्रेनने एका ट्रकला जोरदार धडक दिल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून अंगावर काटा येईल,असा हा व्हिडिओ आहे. अमेरिकेच्या टेक्सासमधील शहर सँट एंटोनियो येथील हा व्हिडिओ आहे. यामध्ये एक ट्रक रेल्वे रूळ ओलांडताना दिसत आहे. परंतु दुसरीकडे पाहिलं असता, समोरून भरधाव ट्रेनने एका ट्रकला धडक दिल्याचं पाहायला मिळत आहे.

    PermianLandman नावाच्या हँडलवरुन शेअर करण्यात आला व्हिडिओ

    मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी दुपारी घडली. हायवे १८३ वर ट्रक रेल्वे रूळावर थांबला होता. परंतु ट्रेनने टक्कर दिल्यामुळे ट्रकचा मागील हिस्सा उडवून गेला आहे. तसेच पुढील भाग सुद्धा पलटी झाला होता. परंतु सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक जणांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.