पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या चर्चेत घुसले भारतीय हॅकर्स

जम्मू काश्मीर प्रश्नात नाक खुपसण्याची पाकिस्तानची सवय जाता जात नाहीय. पाकिस्तान कांगावा करत असलेल्या पाकव्याप्त काश्मीरवर आपला दावा सांगण्याचे असफल प्रयत्न पाकिस्तानकडून नेहमीच होत असतात. असाच एक प्रयत्न भारतीय हॅकर्सनी हाणून पाडलाय.

भारतीय हॅकर्सनी पाकिस्तानचे एक सेमीनर हॅक केले. या सेमीनारमध्ये जम्मू काश्मीर प्रश्नावर चर्चा सुरू होती. त्यात हॅकिंग करत भारतीय हॅकर्सनी जय श्रीरामचे नारे दिले.

पाकिस्तानातील काही अधिकारी या कॉन्फरन्समध्ये जम्मू काश्मीरबाबत काही धोरणं ठरवत होते. काही वेळानंतर सेमीनारमधील सर्वांना भगवान रामाची गाणी ऐकू येऊ लागली. सेमीनारमधील सदस्यांना वाटले की सेमीनारचे आयोजक डॉ. वलीद मलिक यांच्याकडून ही गाणी ऐकू येत असतील. त्यामुळं मलिक यांना इतरांनी गाणी बंद करण्याची सूचना दिली.

त्यानंतरही मधून मधून ‘आम्ही हिंदुस्थानी आहोत, तुम्ही रडतच राहा. जय श्रीराम’ असे नारे ऐकू येऊ लागले. नंतर समाजमाध्यमांवर या व्हिडिओची क्लीप चांगलीच व्हायरल झाली. यापूर्वी काही भारतीय हॅकर्सनी पाकिस्तानी विद्यापीठांची वेबसाईटही हॅक केली होती.