प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

चीनमधील कोळशाच्या खाणीत कार्बन मोनोऑक्‍साईडची पातळी प्रमाणापेक्षा अधिक वाढल्यामुळे १८ कामगारांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना योंगचुआन जिल्ह्यातील चोंगकिंग नगरपालिकेतील दियाओशुइदोंग येथील कोळसा खाणीमध्ये शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. खाणीमध्ये कार्बन मोनोक्‍साईडचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढल्याने या १८ कामगारांचा मृत्यू झाला. अडकलेल्या खाण कामगारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न पोलिस अधिकारी आणि अग्निशमन दलासह बचाव कर्मचारी करीत आहेत, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.

बीजिंग (Bijing).  चीनमधील कोळशाच्या खाणीत कार्बन मोनोऑक्‍साईडची पातळी प्रमाणापेक्षा अधिक वाढल्यामुळे १८ कामगारांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना योंगचुआन जिल्ह्यातील चोंगकिंग नगरपालिकेतील दियाओशुइदोंग येथील कोळसा खाणीमध्ये शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. खाणीमध्ये कार्बन मोनोक्‍साईडचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढल्याने या १८ कामगारांचा मृत्यू झाला. अडकलेल्या खाण कामगारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न पोलिस अधिकारी आणि अग्निशमन दलासह बचाव कर्मचारी करीत आहेत, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.

दियाओशुइदोंग कोळसा खाण १९७५ साली सुरू करण्यात आली आणि १९९८ साली ही खाण खासगी मालकीची झाली. या खाणीतून दरवर्षी १.२० लाख टन कोळशाचे उत्खनन केले जाते. २०१३ मध्ये याच खाणीतून हायड्रोजन सल्फाईड या विषारी वायूची गळती झाल्यामुळे तीन कामगारांचा मृत्यू झला होता आणि दोघे जण अत्यवस्थ झाले होते.