Alexander, the Mughals, the British, the United States after the Soviet Union; ‘Cemetery of Empires’ is a bloody history of Afghanistan and the Taliban

काबुल विमानतळ आणि पंजशीर खोरे वगळता सर्वत्र तालिबानने वर्चस्व स्थापन केले आहे. उत्तर आघाडीचे माजी कमांडर अमहद शाह मसूदचा बालेकिल्ला पंजशीर खोऱ्यातील राजधानी काबूल जवळच आहे.हे खोरे इतके धोकादायक आहे की 1980 पासून 2021 पर्यंत या क्षेत्रावर तालिबानला कधीच ताबा मिळविता आलेला नाही. एवढेच नव्हे तर रशिया आणि अमेरिकन सैन्यानेही या भागात केवळ हवाई हल्लेच केले आहेत. भौगोलिक स्थिती पाहू जाता त्यांनीही कधीच जमिनीवरून कारवाई केलेली नाही.

  काबुल : अफगाणिस्तानचा ताबा मिळविल्यानंतर तालिबान सत्ता स्थापनेची तयारी करीत आहे. राष्ट्रपती अशरफ गनी देश सोडून पळाले असले तरी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह अद्यापही तालिबानविरोधात लढाई लढत आहेत. सालेह यांच्या सैन्याने तालिबानच्या ताब्यातून काबूलमधील उत्तरेकडील परवन प्रोव्हींसमध्ये चरिकर भागाचा ताबा घेतला आहे. तर पंजशीर येथे तालिबानविरोधात अद्यापही युद्ध सुरू आहे. मंगळवारीच सालेह यांनी गनी यांच्या अनुपस्थितीत स्वत:ला देशाचे काळजीवाहू राष्ट्रपती घोषित केले होते.

  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजशीर कंठ येथील सीमेवर तालिबानविरोधात लढाई सुरू असून सालेह यांच्या सैन्याने परवान प्रांतातील चरिकर भागावर नियंत्रण मिळविले आहे. दुसरीकडे, संपूर्ण अफगाणिस्तानात मात्र बदलत्या स्थितीमुळे परिस्थिती चिघळली आहे.

  काबुल विमानतळ आणि पंजशीर खोरे वगळता सर्वत्र तालिबानने वर्चस्व स्थापन केले आहे. उत्तर आघाडीचे माजी कमांडर अमहद शाह मसूदचा बालेकिल्ला पंजशीर खोऱ्यातील राजधानी काबूल जवळच आहे.हे खोरे इतके धोकादायक आहे की 1980 पासून 2021 पर्यंत या क्षेत्रावर तालिबानला कधीच ताबा मिळविता आलेला नाही. एवढेच नव्हे तर रशिया आणि अमेरिकन सैन्यानेही या भागात केवळ हवाई हल्लेच केले आहेत. भौगोलिक स्थिती पाहू जाता त्यांनीही कधीच जमिनीवरून कारवाई केलेली नाही.

  प्राप्त माहितीनुसार, उपराष्ट्रपती सालेह हे याच भागातील असून सद्यस्थितीत ते येथेच मुक्कामी असल्याचे समजते. रविवारीच त्यांनी कोणत्याही परिस्थितीत तालिबानी अतिरेक्यांसमोर मान झुकवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. एवढेच नव्हे तर तालिबानसोबत एकाच छताखाली कधीच राहणार नाही, असेही त्यांनी ठणकावले होते. तालिबानविरोधात त्यांनी केलेल्या बंडामुळे अफगाणी सैन्यालाही स्फुरण चढण्याची शक्यता आहे.

  देशांतर्गतही तालिबानला काही ठिकाणी विरोध होत आहे. काबूलमध्ये काही महिला आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या तसेच अफगाणिस्तानच्या जलालाबाद शहरात बुधवारी लोक रस्त्यावर उतरले होते. जलालाबादमधील कार्यालयांवर तालिबानच्या झेंड्याऐवजी अफगाणिस्तानचा झेंडा फडकवण्यात यावा, अशी त्यांची मागणी होती. जलालाबादमधील लोकांचा हा विरोध तालिबानला अजिबात रुचला नाही. त्यांनी आंदोलकांवर गोळ्या झाडल्या.

  अफगाणिस्तानात सत्ता काबीज करणारे तालिबानचे उपनेते मुल्ला अब्दुल गनी बरदार काबूलला परतला. कतारची राजधानी दोहा येथे संघटनेच्या इतर नेत्यांशी चर्चा करण्यासाठी तो गेला होता. मुल्ला बरादर अफगाणिस्तानातील 20 वर्षांच्या युद्धाचा विजेता म्हणून उदयास आला आहे. त्याला तालिबानचा नायक मानले जाते. बरादर अफगाणिस्तानचा पुढील राष्ट्राध्यक्ष बनू शकतो, अशी चर्चा देखील सुरु आहे.

  अफगाणिस्तानात अस्थिरता निर्माण झाली असून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही यावर चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, आता तालिबानने अमेरिकेला 11 सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तान सोडण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेने त्यांचे सर्व सैनिक परत बोलवावेत असे तालिबानने म्हटले आहे. अमेरिकेचे 6 हजार सैनिक अद्यापही अफगाणिस्तानात उपस्थित आहेत.