३० हजारफूट तुर्की एअरलाइन्स विमानातच अफगाणी महिलेने दिला गोंडस मुलीला जन्म ; एअरहॉस्टेसने निभावली दाईची भूमिका

सोमन आणि त्यांचे पती या दोघेही काबुलहून दोघंही बर्मिंघमसाठी तुर्की एअरलाइन्सच्या विमानातून निघाले.विमानाचे उड्डाण झाल्यानंतर काही वेळातच गर्भवती सोमन नूरी यांना प्रसुती कळा सुरू झाल्या, यावेळी प्रसंग सावधान राखत विमानातील क्रू सोमन यांच्यासाठी धावून आला.

    अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या हिंसक प्रवृत्तीला घाबरून अनेक अफगाणी नागरिक दुसऱ्या देशांमध्ये स्थलांतर करताना करत आहेत. मोठ्या संख्येने अफगाणी नागिरक काबूल विमातळावर गर्दी करत आहेत. हे करत असताना संख्या अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशीच एका भावनिक घटना समोर आली आहे. अफगाण सोडून स्थलांतर करत असताना नऊ महिन्याच्या गर्भवतीची विमानातच प्रसूती झाली आहे. २६ वर्षीय अफगाणी महिला सोमन नूरी हिनं ३० हजार फूट उंचीवर तुर्की एअरलाइन्सच्या (Turkish Airlines )विमानात चिमुकलीला जन्म दिला. विमानात यावेळी कोणताही डॉक्टर नव्हता. अशा कठीण प्रसंगी विमानातील कर्मचाऱ्यांनीच तिची मदत केली. आई आणि बाळ दोघेही सुखरुप असल्याचे सांगण्यात आले आहे. तुर्कस्थानच्या स्थानिक माध्यमांनी हे वृत्त दिले आहे.

    सोमन आणि त्यांचे पती या दोघेही काबुलहून दोघंही बर्मिंघमसाठी तुर्की एअरलाइन्सच्या विमानातून निघाले.विमानाचे उड्डाण झाल्यानंतर काही वेळातच गर्भवती सोमन नूरी यांना प्रसुती कळा सुरू झाल्या, यावेळी प्रसंग सावधान राखत विमानातील क्रू सोमन यांच्यासाठी धावून आला. विमानातील महिला कर्मचारी आणि एअरहॉस्टेस त्यांच्यासाठी देवदूत ठरल्या. सोमन नूरी यांनी गोंडस मुलीला जन्म दिला आणि उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. सोमन नूरी यांनी मुलीचं नाव हव्वा असे ठेवले आहे. त्यानंतर विमान कुवेत येथे उतरविण्यात आले. आई आणि बाळाला डॉक्टरांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले . दोघंही सुखरूप आणि सदृढ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.