‘पाकिस्तान मुर्दाबाद’… च्या घोषणा देत अफगाण महिला उतरल्या रस्त्यावर ; रात्रभर निर्देशने सुरूच

पाकिस्तानने केलेल्या घुसखोरीच्या विरोधात आंदोलन करताना महिलांनी पाकिस्तान मुर्दाबाच्या घोषणा दिल्या .

    काबूल: अफगाणिस्तानमध्ये पाकिस्ताने (Pakistan) केलेल्या हस्तक्षेपाच्या विरोधात नागरिकांचा रोष उफाळून आला आहे. याचा प्रत्यय काबूल(Kabul) मध्ये आला आहे. पाकिस्तनाच्या विरोधात महिलांनी काल रात्रभरनिर्दशने करता घोषणाबाजी केली. तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर अफगाणिस्थानच्या विविध शहरांमध्ये महिला आपल्या हक्कांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलने करता आहेत.

    पाकिस्तानने केलेल्या घुसखोरीच्या विरोधात आंदोलन करताना महिलांनी पाकिस्तान मुर्दाबाच्या घोषणा दिल्या . दुसरीकडे तालिबान्यांनी पंजाशीरची लढाई जिंकत संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याचे वृत्त तेथील स्थानिक मीडियाने दिले आहे. काही लष्करी विमानांनी पंजशीरमध्ये तालिबानच्या तळांवर हल्ला केला आहे. मात्र ही विमाने कोणत्या देशाची आहेत हे स्पष्ट नाही.

    सोमवारी तालिबानने दिलेल्या माहितीनुसार , त्यांनी पंजशीर जिंकले आहे व आता संपूर्ण अफगाणिस्तान त्याच्या ताब्यात असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, विरोधी दलाने अद्यापही हार मानली नाही, तर राष्ट्रीय प्रतिरोध दलाचे, म्हणजे संपूर्ण अफगाणिस्तानचे नेते अहमद मसूद यांनी तालिबानविरोधी युद्ध सुरूच असल्याचे म्हटले आहे.

    अफगाणिस्तानच्या नागरिकांनो तुम्ही देशाच्या आत असाल किंवा देशाबाहेर, मी तुम्हाला अफगाणिस्तानच्या सन्मान, स्वातंत्र्य आणि समृद्धीसाठी राष्ट्रीय बंड पुकारण्याचे आवाहन करतो.

    अहमद मसूद ,अफगाणिस्तानचे नेते