अफगाणी महिलांना शिक्षण मिळेल पण …..

महिला काम करू शकतात तसेच अभ्यासही करू शकतील असे म्हणत अफगाणिस्तानातील महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचा दावा त्यांनी केला आहे.

    काबूल: तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर महिलांच्या सुरक्षेचा, हक्क, अधिकार, शिक्षणाचे नेमके काय होणार याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते. महिलांवर होत अत्याचाराच्या घटनाही समोर येत आहेत. अशातच मुलींच्या शिक्षणाबाबत तालिबान्यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.

    तालिबानचे कार्यवाहक उच्च शिक्षणमंत्री अब्दुल बाकी हक्कानी म्हटले आहे की, ” तालिबानच्या राजवटीत मुली विद्यापीठात शिकू शकतील मात्र, या काळात मुला -मुलींचे वर्ग एकत्र चालणार नाहीत १९९० च्या राजवटीत तालिबान मुलींच्या शिक्षणाच्या पूर्णपणे विरोधात होता. अफगाणिस्तानचे लोक शरिया कायद्यानुसार उच्च शिक्षण घेऊ शकतील. परंतु या काळात मुलं आणि मुलींचे वर्ग स्वतंत्रपणे चालतील.

    याबरोबरच पुरुष शिक्षक मुलींना शिकवून शकणार नसल्याचे तालिबान्यांनी म्हटले आहे. शरिया कायद्यानुसार शिक्षणातील कृतीकार्यक्रम ठेवण्यात येतील असे ही हक्कानी यांनी म्हटले आहे.

    तालिबानला इस्लामिक अभ्यासक्रम तयार करायचा आहे. हा अशाप्रकारे तयार केला जाईल जो आपल्या इस्लामिक, राष्ट्रवादी आणि ऐतिहासिक मूल्यांनुसार असेल. त्याचबरोबर इतर देशांशी स्पर्धा करण्यासही सज्ज असेल, असेही ते म्हणाले आहेत.

    अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापना केल्यापासून तालिबान सातत्याने इथल्या लोकांचे आयुष्य अगदी चांगले बनवणार असल्याचे म्हणत आहे. आपल्यातील बदलाबद्दल सतत बोलत आहे. इतकेच नाही तर महिला काम करू शकतात तसेच अभ्यासही करू शकतील असे म्हणत अफगाणिस्तानातील महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचा दावा त्यांनी केला आहे.