अफगाणिस्तानकडून तालिबानवर रॉकेट हल्ले, जवळपास २५४ दहशतवाद्यांचा खात्मा

अफगाण सैनिकांनी २४ तासांतच काबूल, कंदहार, कुंदूज, हेरात, हेलमंद आणि गझनीसह दहशतवाद्यांच्या एकूण १३ ठिकाणांवर एअरस्ट्राइक केले आहे. कालही अफगाणिस्तानच्या हवाई दलाने कंदहार येथील तालिबानी दहशतवाद्यांच्या बंकर्सना निशाणा केले होते. या कारवाईत १०हून अधिक दहशतवादी मारले गेले होते.

  अफगाणिस्तानकडून तालिबानवर रॉकेट हल्ले करण्यात आले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये  जवळपास २५४ तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर यामध्ये ९७ दहशतवादी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अफगाणिस्तानने तालिबानी दहशतवाद्यांवर केलेली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात भरलेले एक वाहन उडवण्यात आले. यादरम्यान अफगाण सैनिकांनी १३ आयईडीही डिफ्यूज केले.

  १३ ठिकाणांवर केले एअरस्ट्राइक

  अफगाण सैनिकांनी २४ तासांतच काबूल, कंदहार, कुंदूज, हेरात, हेलमंद आणि गझनीसह दहशतवाद्यांच्या एकूण १३ ठिकाणांवर एअरस्ट्राइक केले आहे. कालही अफगाणिस्तानच्या हवाई दलाने कंदहार येथील तालिबानी दहशतवाद्यांच्या बंकर्सना निशाणा केले होते. या कारवाईत १०हून अधिक दहशतवादी मारले गेले होते.

  अनेक प्रांतांच्या राजधान्यांवरही तालिबान कब्जा करण्याची भीती

  तालिबानने अफगाणिस्तानच्या मोठ्या भूभागावर कब्जा करायला सुरुवात केली आहे. अनेक शेजारील देशांना लागून असलेल्या सीमेवरही त्यांनी नियंत्रण मिळवले आहे. तसेच अनेक प्रांतांच्या राजधान्यांवरही तालिबान कब्जा करण्याची भीती आहे. अमेरिकन-नाटो सैनिकांचे परतण्याचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे.

  ३१ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण होईल.अफगाणिस्तानातील ८५ भागांवर कब्जा मिळवल्याचा दावा तालिबानने केला होता. त्यामुळे उत्तर अफगाणिस्तानसह कंदहारमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.

  afghanistan airforce airstrike on taliban nrms