मौत का डर : तालिबानच्या तावडीतून सुटण्यासाठी अफगाणच्या महिला पोलीस अधिकाऱ्याचा संघर्ष

34 वर्षीय गुलफरोज एब्टेकर यांच्यामते, 15 ऑगस्ट रोजी तालिबानने काबूलवर कब्जा केल्यानंतर तिला देश सोडायचा होता. यासाठी ती काबूल विमानतळावर पोहोचली. पण तिथे गोळ्यांचा वर्षाव सुरु होता. "इथल्या परिस्थितीचे वर्णन करता येणार नाही. मी माझ्या डोळ्यांसमोर स्त्रिया आणि मुलांना मरताना पाहिलंय." अशी प्रतिक्रिया गुलफरोज एब्टेकर यांनी न्यूयॉर्क पोस्टला दिली आहे.

  अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर आता अफगाणिस्तानच्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर स्वत:चा जीव वाचवण्यासाठी भुमीगत होण्याची वेळ आली आहे. त्यांना भीती आहे की तालिबानी त्यांना शोधून त्यांची क्रूरपणे हत्या करतील. कारण तशा अनेक घटनाही समोर आल्या आहेत. आता अफगाणिस्तान पोलीस दलातील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याची वेदनादायक कहाणी समोर आली आहे.

  या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे गुलफरोज एब्टेकर. 15 ऑगस्टपासून गुलफरोज कसा तरी देश सोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना तालिबान्यांनी बेदम मारहाणही केली असून सध्या त्या काबूलमध्ये लपून बसल्या आहेत. गुलफरोजने एका रशियन वृत्तपत्राला मुलाखत दिली त्यात तिने आपली वेदना सांगीतली आहे. अमेरितेकील प्रसिध्द वृत्तपत्र असलेल्या ‘न्यूयॉर्क पोस्ट’ ने देखील त्यांची मुलाखत प्रकाशित केली आहे.

  या मुलाखतीत गुलफरोज एब्टेकर म्हणतात की, “मी काबूल पोलिसात गुन्हे अन्वेषण शाखेची उपप्रमुख होते. बऱ्याचदा मीडियात येत असे, त्यामुळे सर्वांनी माझा चेहरा परिचयाचा आहे. अगदी तालिबान्यांनाही माहित आहे.”

  34 वर्षीय गुलफरोज एब्टेकर यांच्यामते, 15 ऑगस्ट रोजी तालिबानने काबूलवर कब्जा केल्यानंतर तिला देश सोडायचा होता. यासाठी ती काबूल विमानतळावर पोहोचली. पण तिथे गोळ्यांचा वर्षाव सुरु होता. तिथल्या परिस्थितीचे वर्णन करता येणार नाही. मी माझ्या डोळ्यांसमोर स्त्रिया आणि मुले मरताना पाहिली.

  गल्फारोझ पुढे म्हणतात “मी अनेक देशांच्या दूतावासांना संदेश पाठवले. इथल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी भीक मागितली. पण काही उपयोग झाला नाही. काबूल विमानतळावर तैनात असलेले अमेरिकन सैनिक मदत करतील या अपेक्षेने आम्ही निर्वासित छावणीतही गेलो. मी तेथल्या अमेरिकन सैनिकांना माझी कागदपत्रे, पासपोर्ट आणि ओळखपत्र दाखवले. त्याने मला विचारले तुला कुठे जायचे आहे? मी म्हणाले – कोणताही देश जिथे मी सुरक्षित राहू शकेन. यावर तो ठीक आहे म्हणाला.”

  “तो ठीक म्हटल्यावर, त्या अमेरिकन अधिकाऱ्याने एका शिपायाला इशारा केला. आम्हाला वाटले की तो आम्हाला विमानात बसवणार आहे किंवा आम्हाला सुरक्षा देणार आहे, पण त्याने आम्हाला रस्त्यावर नेले आणि बंदूक घेऊन पळून जाण्यास सांगितले. त्यावेळी मला जाणवलं की आता लोकांमध्ये माणुसकी उरली नाही.”

  ती पुन्हा विमानतळाच्या दिशेने निघाली होती पण तेवढ्यात तालिबान्यांनी तिला रस्त्यातच अमानुषपणे मारहाण केली. दगड फेकुन मारले.

  गुलफरोज एब्टेकर तिथून घरी गेली. घरी जाताच तिच्या आईने सांगीतलं बेटा, तालिबानचे सैनीक तुला शोधत इथं आले होते. त्यामुळे गुलफरोज घरी न राहता घरा शेजारील एका झोपडीत रहायला गेली. त्यानंतर तिने न्यूयॉर्क पोस्टला मुलाखत दिली. आता न्यूयॉर्क पोस्टने सेंट्रल कमांडला या संदर्भात खुलासा करण्यास सांगीतलं आहे.