अमेरिकेकडून अफगाणिस्तानच्या विमान उड्डाणांवर बंदी, काबुलमध्ये एयरलिफ्ट पुन्हा एकदा थांबलं..

गोवरचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अफगाणिस्तानातून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. याआधी अमेरिकेने सांगितलं की, 3 दिवसांत काबुलमधून अमेरिकेसमवेत 250 नागरिकांना बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. या नागरिकांना कतार विमानातून दोहा येथे आणण्यात आले आणि तेथून बरेच लोकं अमेरिकेत पोहोचत आहेत.

    अमेरिकेत आलेल्या काही निर्वासितांमध्ये गोवरचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या विमान उड्डाणांवर बंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे काबुलमध्ये एयरलिफ्ट पुन्हा एकदा थांबलं आहे. गोवरचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अफगाणिस्तानातून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. याआधी अमेरिकेने सांगितलं की, 3 दिवसांत काबुलमधून अमेरिकेसमवेत 250 नागरिकांना बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. या नागरिकांना कतार विमानातून दोहा येथे आणण्यात आले आणि तेथून बरेच लोकं अमेरिकेत पोहोचत आहेत.

    दिल्लीत अफगाणच्या मुलांनी दिल्या तालिबान मुर्दाबादाच्या घोषणा

    तालिबानची हुकूमशाही आणि त्यांच्या तानाशाहीनंतर काबुलचं नाही तर संपूर्ण जगभरातून प्रदर्शन होताना दिसत आहे. दिल्लीमध्ये अफगाणी नागरिकांनी सुद्धा शुक्रवारी विरोध-प्रदर्शन केलं होतं. यामध्ये काही महिला आणि मुलं यांचा समावेश होता. ते पंजशीरमध्ये तालिबानसोबत संघर्ष करणाऱ्या अहमद मसूदचं समर्थन आणि तालिबान-पाकिस्तानचं विरोध करताना दिसत होते.

    प्रदर्शन करणाऱ्या नागरिकांनी हातामध्ये पोस्टर घेतले होते. त्यावर तालिबान मुर्दाबाद, अफगाणिस्तान ही तालिबान्यांची जागा नाहीये. आम्हाला स्वातंत्र्य पाहीजे, अफगाणिस्तान जखमी आहे, पाकिस्तानचं दहशतवाद्यांना पाठिंबा आहे आणि घोषणा लिहिल्याप्रमाणे पाकिस्तानवर बंदी घाला. अशा प्रकारचे पोस्टर्स हातामध्ये धरून लोकं विरोध प्रदर्शन करत होते.