Afghanistan is the hideout of the Taliban; Two consecutive bomb blasts near Kabul airport, killing 13 people on the spot

अफगाणिस्तान तालिबान्यांचा हैदोस सुरु आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या विमानतळाजवळ गुरुवारी एकापाठोपाठ दोन भयंकर बॉम्बस्फोट झाले आहेत. दोन स्फोटांमध्ये आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. त्याचबरोबर इतर अनेकजण या स्फोटात गंभीर जखमी झाले आहेत.

    काबूल : अफगाणिस्तान तालिबान्यांचा हैदोस सुरु आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या विमानतळाजवळ गुरुवारी एकापाठोपाठ दोन भयंकर बॉम्बस्फोट झाले आहेत. दोन स्फोटांमध्ये आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. त्याचबरोबर इतर अनेकजण या स्फोटात गंभीर जखमी झाले आहेत.

    पहिला स्फोट विमानतळाजवळील बरून हॉटेलजवळ झाला. जेथे ब्रिटिश सैनिक राहत होते. दुसरा स्फोटही विमानतळाजवळ झाला. पहिल्या स्फोटानंतर फ्रान्सने दुसऱ्या स्फोटाबाबत अलर्ट जारी केला होता. ज्याच्या काही वेळानंतर पुन्हा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर संपूर्ण विमानतळ आणि आसपासच्या परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    स्फोटच्या काही वेळापूर्वी काबूल विमानतळावरून उड्डाण केलेल्या इटालियन लष्करी विमानावर गोळीबार करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने विमानतळावरून उड्डाण करताच त्यावर गोळीबार करण्यात आला.