..तर अफगाणिस्थान घेणार भारतीय लष्कराची मदत

अफगाणिस्तानचे भाततातील राजदूत फरीद मामुंडजे यांनी सांगीतले की, “देशात शांतता कायम ठेवण्यासाठी अफगाणी सरकार आणि तालीबानी नेत्यांनी चर्चेसाठी एकाच व्यासपीठावर येण्याची गरज आहे. एक अशी वेळ सुध्दा येवू शकते की भारतीय सैन्याच्या मदतीची मागणी केली जाईल.”

  अफगाणिस्तान मधून अमेरिकी लष्कराने तब्बल वीस वर्षाने घरवापसी केल्यानंतर तालिबानी संघटनांनी पुन्हा एकदा आपल्या कारवाया करायला सपरुवात केली आहे. त्यामुळे देशात शांतता रहावी म्हणून अफगाणिस्तान तालिबान्यांशी चर्चा करत आहे. या संदर्भात बोलताना अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुंडजे म्हणाले की, “जर तालिबान्यांशी चर्चा अयशस्वी ठरली तर भविष्यात भारतीय सैन्याची मदत घेतली जाऊ शकते.”

  ही मदत प्रत्यक्ष सैन्य पाठवता अफगाण सैन्यासाठी प्रशिक्षण आणि तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण अशा स्वरुपात असेल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

  अफगाणिस्तानचे भाततातील राजदूत फरीद मामुंडजे यांनी सांगीतले की, “देशात शांतता कायम ठेवण्यासाठी अफगाणी सरकार आणि तालीबानी नेत्यांनी चर्चेसाठी एकाच व्यासपीठावर येण्याची गरज आहे. एक अशी वेळ सुध्दा येवू शकते की भारतीय सैन्याच्या मदतीची मागणी केली जाईल.”

  फरीद मामुंडजे म्हणाले की, “तिकडे परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तब्बल १५० जिल्ह्यांत अजूनही संघर्ष सुरु आहे. यातील काही जिल्हे तालिबान्यांच्या ताब्यात गेले आहेत. या संघर्षात गेल्या 10 आठवड्यांत 3,600 लोकांनी आपला जीव गमावला असून दोन लाख नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे.”

  एएफपी या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार जवळजवळ दोन दशके अफगाणिस्तानात राहत असलेल्या अमेरिकन सैनिकांची माघार सुरू झाली आहे. ऑगस्टपर्यंत म्हणजेच पुढील महिन्यात ते अमेरिकेत परततील.

  दरम्यान, या तणावाच्या पार्श्वभुमीवर भारताने अलीकडेच अफगाणिस्तानमधील भारताच्या वाणिज्य दूतावासातून आपले मुत्सद्दी व कर्मचाऱ्यांना परत बोलवले असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने याला दुजोरा दिलेला नाही.