अंधारात बुडणार अफगाणिस्तान, ६.२ कोटी डॉलर्सच्या वीज बिलाची थकबाकी, तालिबानची झोळी मात्र रिकामी

अफगाणिस्थानला होणारा वीज पुरवठा हा प्रामुख्याने उजबेकिस्तान आणि ताजिकिस्तानातून होतो. तालिबान सत्ता मिळवल्यापासून देशातील अनेक व्यवसाय, उद्योगधंदे बंद पडले आहेत. अशा स्थितीत बाहेरुन वीज केरदी करण्यासाठी तालिबानकडे ना पैसे आहेत ना दुसरा कोणता पर्याय आहे. सरकारी वीज कंपनीने येत्या हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात वीजकपातीचा इशारा यापूर्वीच दिला आहे. विजेचे बीलच चुकविले नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

    काबूल – अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी असलेल्या काबूवरील संकट थांबायचे नाव घेत नाहीयेत. काबूल आणि अन्य अफगाणी प्रांत सध्या पूर्ण अंधारात बुडालेले आहेत. अफगाणिस्तानातील सरकारी वीज कंपनी द अफगाणिस्तान ब्रेशना शेफरतने बुधवारी जाहीर केले की, उजबेकिस्तानातून होणाऱ्या विद्युत पुरवठ्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे वीज गायब झाली आहे. तालिबानने अफगाणिस्तानावर कब्जा केल्यापासून देशाला सातत्याने नवनव्या संकटांचा सामना करावा लागतो आहे. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे थांबली असून, बँकिंग क्षेत्रही अडचणींचा सामना करते आहे.

    दरम्यान एका वृत्तानुसार मध्य आशियातील देशांनी दिलेल्या वीजेच्या बिलाची ६.२ कोटी डॉलर्सची थकबाकी अफगाणिस्तानच्या सरकारी वीज कंपनीने अद्यापही चुकवलेली नाही. सरकारी अधिकाऱ्यांची संपत्ती विकून हे बिल चुकवण्याची तयारी आता कंपनीने सुरु केली आहे. उत्तर अफगाणिस्तानातील बगलान प्रांताचा वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. लवकरच या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल, असा दावा वीज कंपनीकडून करण्यात येतो आहे.

    अफगाणिस्तानला होणारा वीज पुरवठा हा प्रामुख्याने उजबेकिस्तान आणि ताजिकिस्तानातून होतो. तालिबान सत्ता मिळवल्यापासून देशातील अनेक व्यवसाय, उद्योगधंदे बंद पडले आहेत. अशा स्थितीत बाहेरुन वीज केरदी करण्यासाठी तालिबानकडे ना पैसे आहेत ना दुसरा कोणता पर्याय आहे. सरकारी वीज कंपनीने येत्या हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात वीजकपातीचा इशारा यापूर्वीच दिला आहे. विजेचे बीलच चुकविले नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

    चीनमध्ये वीजेचं संकट निर्माण होण्याची शक्यता

    दुसरीकडे चीनमध्येही वीजसंकट निर्माण झाले असून ते अधिक गहिरं होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात खरेदीनंतरही चीनमध्ये कोळशाच्या किमती यावर्षी तिप्पट झाल्या आहेत. सप्टेंबरमध्ये चीनच्या एकूण कोळसा आयातीत ७६ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोळखा खरेदी करुनही चीनमधील विद्युत प्रकल्पांना योग्य प्रमाणात कोळसा मिळत नाहीये. त्यामुळे येत्या काळात जगातील दोन नंबरची मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनला याचा फटका सहन करावा लागणार आहे.