तालिबांनचा ‘हा’ नेता बनणार अफगाणिस्तानचा नवा ‘पंतप्रधान’…

तालिबान पंतप्रधानपदाच्या शर्यतीत तीन नावे पुढे आहेत. त्यात अब्दुल गनी बरादर, मुल्ला बरादर आणि मुल्ला याकूब यांचा समावेश आहे. मुल्ला उमर हा मुल्ला याकूबचा मुलगा आहे. मुल्ला उमरने १९९६ साली अफगाणिस्तानमध्ये इस्लामी अमिरातची स्थापना केली होती.

    अफगाणिस्तानवर(Afganisthan) तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तालिबांनी (Taliban) आता अफगाणिस्तानमध्ये आपले सरकार प्रस्थापित करणार आहे. इराणच्या धर्तीवर सरकार स्थापन करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. या सरकारमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मुल्ला बरादर (Mulla Baradar)सर्वात पुढे असल्याचे सांगण्यात येत आहे. तर मुल्ला हकीमची मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

    तालिबानी वरिष्ठ नेते हिबतुल्लह अखुंदजादा असणार आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची स्थापना होणार आहे. या परिषदेत ११ ते २७ सदस्य असणार आहे. सध्या अफगाणिस्तानची राजधानी काबुल आहे. परंतु तालिबान्यांच्या राज्यात कंधार ही नवी राजधानी असणार आहे, कारण कंधार ही तालिबान्यांची पारंपरिक राजधानी आहे.

    तालिबान पंतप्रधानपदाच्या शर्यतीत तीन नावे पुढे आहेत. त्यात अब्दुल गनी बरादर, मुल्ला बरादर आणि मुल्ला याकूब यांचा समावेश आहे. मुल्ला उमर हा मुल्ला याकूबचा मुलगा आहे. मुल्ला उमरने १९९६ साली अफगाणिस्तानमध्ये इस्लामी अमिरातची स्थापना केली होती. १९८० साली सोव्हिएतच्या लढ्यात मुल्ला उमरने नेतृत्व केले होते. ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये हल्ला केला होता. तेव्हा मुल्ला उमरने अफगाणिस्तानमधून पळून गेला होता.