donald trump

 फेसबुक आणि ट्विटर पाठोपाठ आणखी एका  कंपनीने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंदी घातली आहे. युट्यूबने बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(donald trump) यांच्या अकाऊंटवर तात्पुरती बंदी घातली आहे.

फेसबुक आणि ट्विटर पाठोपाठ आणखी एका  कंपनीने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंदी घातली आहे. युट्यूबने बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(donald trump) यांच्या अकाऊंटवर तात्पुरती बंदी घातली आहे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हा हिंसेला प्रोत्साहन देणारा आहे, असे कारण देत युट्यूबने ही कारवाई(action by youtube) केली आहे.

युट्यूबने यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,“सध्या सुरु असणाऱ्या राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आम्ही डोनाल्ड जे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला नवा व्हिडिओ काढला आहे.कारण तो आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारा आहे.” किमान ७ दिवस आता ट्रम्प यांना युट्यूबवर नवा कंटेट अर्थात व्हिडिओ अपलोड करता येणार नाही.

अमेरिकेतील संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर  अनेक कंपन्यांनी ट्रम्प यांच्यावर बहिष्कार टाकला आहे. याआधी ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले होते. फेसबुक, इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांचे अकाऊंट बंद केले.आता युट्यूबनेही त्यांचे खाते बंद केले आहे.