चीनची नवी खेळी? कोरोनाच्या प्रसारासाठी भारत आणि अमेरिकेनंतर आता ऑस्ट्रेलियाला धरले जबाबदार, काय आहे यामागचं कारण?

कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Virus) मोठया प्रमाणावर वाढल्यानंतर आणि पसरल्यानंतर चीनने (China) अमेरिका (America) आणि भारताला (India) जबाबदार धरले होते. परंतु आता चीनने एक नवा डाव मांडला असून चीनने चक्क.., कोरोनाच्या प्रसारासाठी ऑस्ट्रेलियाला (Australia) जबाबदार धरले आहे.

बिजिंग : कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात थैमान घालत आहे. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी लस (Vaccine) विकसित करण्याचे प्रयत्न अनेक देश युद्धपातळीवर करत आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढल्यानंतर आणि पसरल्यानंतर चीनने (China) अमेरिका (America) आणि भारताला (India) जबाबदार धरले होते. परंतु आता चीनने एक नवा डाव मांडला असून चीनने चक्क.., कोरोनाच्या प्रसारासाठी ऑस्ट्रेलियाला (Australia) जबाबदार धरले आहे.

फ्रोझन मीटवरून चीन सातत्याने न्यूझीलंड (New Zealand) आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांवर कोरोना पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांमध्ये फ्रोझन मीटरवर काही चाचण्या करण्यात आल्या. पण चीनला हे सिद्ध करण्यात अपयश आले आहे.

चीनने यापूर्वी अनेकदा कोणत्याही पुराव्यांशिवाय फ्रोझन फूडवरून अन्य देशांवर कोरोनाचा प्रादुर्भाव पसवल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, अनेक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोना महासाथीचा प्रादुर्भाव चीनमधील वुहान मार्केटमधूनच सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी मांस विक्री मोठ्य़ा प्रमाणात केली जाते.

ग्लोबल टाईम्सच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये कोरोनाची निर्मिती झाली नाही. यापूर्वी ऑस्ट्रेलियाशिवाय ब्राझील आणि जर्मनीलाही चीनने जबाबदार धरले होते. कोरोना विषाणू चीनमध्ये ब्राझील आणि जर्मनीमधून येणाऱ्या मांसामुळे पोहोचल्याचा दावा करण्यात आल्यानंतर कोरोना विषाणू २०१९ च्या उन्हाळ्याच्या कालावधीत भारतात निर्माण झाल्याचा ‘चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या वैज्ञानिकांच्या एका टीमनं दावा केला होता.