vaccine corona virus

इस्रायलमधील(Israel) १३ जणांना कोरोनाची लस(corona vaccine) घेतल्यानंतर चेहऱ्याच्या भागात अर्धांगवायूचा झटका(paralysis attack) आल्याची माहिती मिळाली आहे.  इस्रायलमधील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लसीचे साईडइफेक्ट झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

इस्रायलमधील(Israel) १३ जणांना कोरोनाची लस(corona vaccine) घेतल्यानंतर चेहऱ्याच्या भागात अर्धांगवायूचा झटका(paralysis attack) आल्याची माहिती मिळाली आहे.  इस्रायलमधील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लसीचे साईड इफेक्ट झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पॅरालिसिस बरा झाल्यावर आरोग्य मंत्रालयाने नियोजित वेळेनुसार दुसरा डोस देण्याचा आग्रह धरला असला, तरी आता या लोकांना शॉटचा दुसरा डोस देण्यासंदर्भातील भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  इस्रायलमध्ये २० डिसेंबर २०२० पासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून आतापर्यंत ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ७२ टक्क्यांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

नॉर्वेमध्येही करोना लसीकरणानंतर काही वेळातच २३ वृद्ध नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली असतानाच इस्रायलमधूनही कोरोना लसीचे साईडइफेक्ट दिसून आल्याने चिंता वाढली. भारतातही ४४७ जणांवर कोरोना लसीचा साईडइफेक्ट दिसून आले आहेत.