अफगाणिस्थानवरील कब्जानंतर अमेरिकेसह ‘या’ ६० देशांनी थांबवली आर्थिक मदत

अफगाणिस्तानला पुढील चार वर्षांसाठी १२ अब्ज डॉलर्स देण्याचा करार ६० हून अधिक देशांनी नोव्हेंबरमध्ये केला होता . मात्र सद्यस्थिती लक्षात घेता हा पैसाही मिळणेही कठीण आहे. तालिबानने पकडल्यानंतर अफगाणिस्तानला आर्थिक मदत देणार नाही हे जर्मनीने आधीच स्पष्ट केले आहे.

    तालिबान्यांनी अफगाणिस्थानावर कब्जा (Taliban’s occupation of Afghanistan) केल्यानंतर अमेरिकेसह ६० देशांनी तालिबानला मोठा धक्का दिला आहे. या देशांनी अफगाणिस्तानला दरवर्षी मिळणारी अब्जावधी डॉलरची मदत थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, चीन तालिबानच्या समर्थनासाठी पुढे आला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन (Wang Wenbin)यांनी अमेरिकेवर निशाणा साधलाय  ”अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीला फक्त अमेरिकाच जबाबदार आहे. अमेरिकेलाच कारणीभूत आहे. अमेरिका या स्थितीत अफगाणिस्तान सोडून परत जाऊ शकत नाही. युद्धसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या अफगाणिस्तानला बळकटी देण्यासाठी चीन आवश्यक पावले उचलेल.”

    तालिबानला पकडल्यानंतर अमेरिकेच्या बँकांमधील अफगाण सरकारची खाती सील करण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) अफगाणिस्तानला ४६० दशलक्ष डॉलर परत घेण्यासही बंदी घातली आहे. अमेरिकेच्या बँकेत अफगाणिस्तानचे पैसे जमा आहेत.  अफगाणिस्तान सेंट्रल बँकेच्या ९ अब्ज डॉलरच्या परकीय साठ्यापैकी सुमारे ७ अब्ज डॉलर न्यूयॉर्कच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडे आहेत. बिडेन प्रशासनाने हे पैसे आधीच जप्त केले आहेत. उर्वरित पैसाही तालिबानांपर्यंत पोहोचू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अफगाणिस्तानला पुढील चार वर्षांसाठी १२ अब्ज डॉलर्स देण्याचा करार ६० हून अधिक देशांनी नोव्हेंबरमध्ये केला होता . मात्र सद्यस्थिती लक्षात घेता हा पैसाही मिळणेही कठीण आहे. तालिबानने पकडल्यानंतर अफगाणिस्तानला आर्थिक मदत देणार नाही हे जर्मनीने आधीच स्पष्ट केले आहे. युरोपियन युनियनने (EU) असेही म्हटले आहे की जोपर्यंत अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी परिस्थिती स्पष्ट केली नाही तोपर्यंत ते कोणतेही पैसे देणार नाहीत.

    अफगाणिस्तानच्या बिघडल्या स्थितीबाबत इतर देश चिंता व्यक्त करत असताना दुसरीकडे चीनने कुरापती करण्यास सुरवात केली आहे.अफगाणिस्तानच्या समर्थनार्थचीनने तालिबान्याना मदत करण्यास व त्यांच्यावर विश्वास दाखवण्यास सुरुवात केली आहे. ‘आम्ही अफगाणिस्तानातील आमच्या नागरिकांच्या आणि संस्थांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवून आहोत. तेथे आमचे दूतावास तेथे कार्यरत आहेत. अफगाणिस्तानातील बहुतेक चिनी नागरिक आधीच देशात परतले आहेत. उर्वरित नागरिकांना परत आणण्यासाठी आम्ही त्यांच्याशी सतत संपर्कात आहोत. तसेच तेथे उपस्थित असलेल्या चिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.