अफगाणिस्तान ठरू शकतो दहशतवाद्यांसाठी नवीन अड्डा? अलकायदा घेणार तालिबानचा फायदा

अफगाणिस्तानावर तालिबानकडून कब्जा करण्यात आल्यानंतर दहशतवादी संघटना अल कायद्याचा (Al-Qaeda) धोका येथे उदयास येऊ शकतो. अल कायदा पुन्हा एकदा तालिबानच्या समर्थनचा फायदा घेऊ शकतो आणि अफगाणिस्तानमध्ये याची नव्याने सुरूवात होऊ शकते. अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  काबुल: अफगाणिस्तानमध्ये काबूलकडून कब्जा करण्यात आल्यानंतर येथील परिस्थिती प्रचंड प्रमाणात हालाकिची होत आहे. कारण प्रत्येक अफगाण नागरिक या देशातून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी अधिकाधिक नागरिक काबूल विमानतळावर पोहचण्याचा मार्ग शोधत आहेत. परंतु अमेरिकेकडून एक आवाहन करण्यात आलं असून अफगाणिस्तानच्या नागरिकांना काबून विमानतळावरून दूर राहण्यास सांगितलं आहे.

  अल कायदाच्या उदयाचा धोका

  अफगाणिस्तानावर तालिबानकडून कब्जा करण्यात आल्यानंतर दहशतवादी संघटना अल कायद्याचा (Al-Qaeda) धोका येथे उदयास येऊ शकतो. अल कायदा पुन्हा एकदा तालिबानच्या समर्थनचा फायदा घेऊ शकतो आणि अफगाणिस्तानमध्ये याची नव्याने सुरूवात होऊ शकते. अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  पेंटागनने केलेल्या दाव्यानुसार, अफगाणिस्तानात दहशतवादी संघटना अल कायदा आता अस्तित्वात आहे. येणाऱ्या काळात अफगाणिस्तान इतर दहशतवादी गटांचा आश्रयस्थान बनू शकतो. याचदरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी काबुलमधील दहशतवादी संघटना आयएसआयएसके (ISISK)च्या हल्लासंदर्भात अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  हजारो नागरिकांकडून देश सोडण्याचा विचार

  काबुल विमानतळावर गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. अनेक वेळा गोळीबार करण्यात आला आहे. अनेक लोकांचा बळी गेला आहे. ज्याप्रकारे ३१ ऑगस्टची तारीख जवळ येतेय, त्याप्रमाणे काबुल विमानतळावर लोकांची गर्दी वाढत चालली आहे. हजारो लोकांच्या संख्येने विमानतळावर पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत असून देश सोडून जाण्याचा विचार येथील लोक करत आहेत.