कोरोनाच्या संकटातून भारताला बाहेर काढण्यासाठी धावून आला हा मित्र देश , थेट लाइफ सेव्हिंग उपकरणे दिली पाठवून

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात भारतानंही केली होती इस्रायलला मदत केली होती. इस्रायलमधील मुख्य संघटना देखील भारताला होत असलेल्या मदतीच्या प्रयत्नात सहभागी आहे आणि ऑक्सिजन जनरेटर्ससह इतर काही उपरकणे भारतात पाठवत आहेत.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून भारताच्या मदतीसाठी आता थेट ईस्रायलने धाव घेतली आहे. भारतासाठी या आठवड्यात लाइफ सेव्हिंग उपकरणे पाठवण्यास या आठवड्यात सुरुवात केली जाणार आहे. या उपकरणांत ऑक्सिजन जनरेटर्स आणि रेस्पेरेटर्रसचा समावेश आहे. ही सर्व उपकरणे विमानाच्या सहाय्याने भारतात पाठविली जात आहेत. ही विमाने मंगळवारपासून सुरू होतील आणि साधारणपणे संपूर्ण आठवडाभरच सुरू राहतील.

    भारत, इस्रायलचा सर्वात जवळचा आणि महत्वाचा मित्र आहे. दोन्ही देशांतील घट्ट मैत्रीचा हवाला देत परराष्ट्रमंत्री म्हणाले, भारत आणि इस्रायल यांच्यात अनेक प्रकारचे राजकीय, संरक्षण आणि आर्थिक स्वरुपाचे करार आहेत. या कठीण काळात आम्ही पूर्णपणे भारतासोबत उभे आहोत. आम्ही आमच्या भारतीय भाऊ आणि बहिणींसाठी लाइफ सेव्हिंग उपकरणे पाठवत आहोत, असे इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गाबी अश्केनजी यांनी म्हटले आहे. या कार्यात सहकार्य करणारे लोक इस्रायलमधील मुख्य आर्थिक संस्था, जसे इस्रायल-भारत चेम्बर ऑफ कॉमर्स, इस्रायल-एशिया चेम्बर ऑफ कॉमर्स, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इस्रायल, फेड्रेशन ऑफ इस्रायल चेम्बर्स ऑफ कॉमर्स यांच्या सहकार्यासाठीही अश्केनजी यांनी, आभार मानले आहेत.

    कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात भारतानंही केली होती इस्रायलला मदत केली होती. इस्रायलमधील मुख्य संघटना देखील भारताला होत असलेल्या मदतीच्या प्रयत्नात सहभागी आहे आणि ऑक्सिजन जनरेटर्ससह इतर काही उपरकणे भारतात पाठवत आहे. इस्रायलने जारी केलेल्या एका निवेदनात, गेत वर्षी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात भारताने इस्रायलला केलेल्या मदतीचा उल्लेख करत म्हणण्यात आले आहे, की “आम्हाला आठवते, गेल्या वर्षी भारताने कोरोनो व्हायरस संकटाच्या सुरुवातीला, इस्रायलच्या मदतीसाठी कशा प्रकारे मास्क, हँड ग्लोव्हज औषधांसाठी कच्च्या मालासह अनेक गोष्ट्रींच्या एअर डिलिव्हरीला मंजुरी दिली होती आणि इस्रायली नागरिक सुरक्षित पोहोचण्यासाठीही मदत केली होती.”