खासदार अमर सिंह यांचे निधन

राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचं आज सिंगापूर येथे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून अमर सिंह यांच्यावर सिंगापूर येथे उपचार सुरू होते.

राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचं आज सिंगापूर येथे  निधन झाले.  गेल्या अनेक दिवसांपासून अमर सिंह यांच्यावर सिंगापूर येथे उपचार सुरू होते. परंतु आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

गेल्या काही महिन्यांपासून ते सिंगापूरमधील रूग्णालयात दाखल होते. त्यांना आयसीयूमध्ये ठेवलं होतं. यापूर्वी २०१३  मध्ये त्यांना किडनीची समस्या देखील उद्भवली होती. २०१६मध्ये त्यांची खासदार म्हणून निवड झाली होती. केंद्रामध्ये काँग्रेसप्रणित युपीएचं सरकार असताना अमर सिंह यांचं नाव सातत्याने चर्चेत राहिलं. मुलायम सिंग यादव समाजवादी पक्षाचे प्रमुख असताना त्या काळात अमर सिंह यांनी मोलाची भूमिका बजावली होती.