अजब गजब! सन २५८२ मधून ‘तो’ आलाय अन सांगतोय पृथ्वीवर पसरणार अंधार!

६ जून २०२६ मध्ये पृथ्वीवर एक अनोखी घटना घडेल. त्यादिवशी पृथ्वीवर अंधार पसरेल व तो तीन दिवस कायम राहील. त्याच्या या दाव्यावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी त्याची खिल्लीही उडवली आहे. या अंधाराच्या स्थितीत पिरॅमिडमधून प्रकाश येईल असेही त्याने म्हटले आहे. मात्र, त्याचा अधिक खुलासा त्याने केलेला नाही. त्याने यापूर्वीही असे अनेक दावे केले आहेत; पण ते खरे ठरल्याचे काही दिसलेले नाही!

    लंडन : जगभरातील अनोख्या माणसांचे अजब गजब किस्से आपण खूपदा ऐकतो. मात्र हा किस्सा ऐकल्यावर तुम्हीही चकित व्हाल. स्वतःला ‘टाईम ट्रॅव्हलर’ म्हणणाराही एक माणूस या पृथ्वीतलावर आहे. त्याच्या म्हणण्यानुसार तो सन २५८२ मधून आला आहे. पुढील दशकात पृथ्वी तीन दिवसांसाठी अंधारात बुडून जाईल असे त्याने म्हटले आहे.

    टिकटॉकवर भन्नाट दावे
    या माणसाने आपण ‘टाईम ट्रॅव्हलर’ असल्याचे कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. मात्र, तो टिकटॉकवर भन्नाट दावे करीत असतो. आताही त्याने एक व्हिडीओ शेअर केला असून तो ब्रिटनमध्ये टिकटॉकवर गाजत आहे. या ‘टाईम ट्रॅव्हलर’चे टिकटॉकवर ६ लाख ३० हजार फॉलोअर्स आहेत. त्याचा एक व्हिडीओ चार लाख वेळा पाहण्यात आला आहे. त्याने म्हटले आहे की ६ जून २०२६ मध्ये पृथ्वीवर एक अनोखी घटना घडेल. त्यादिवशी पृथ्वीवर अंधार पसरेल व तो तीन दिवस कायम राहील. त्याच्या या दाव्यावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी त्याची खिल्लीही उडवली आहे. या अंधाराच्या स्थितीत पिरॅमिडमधून प्रकाश येईल असेही त्याने म्हटले आहे. मात्र, त्याचा अधिक खुलासा त्याने केलेला नाही. त्याने यापूर्वीही असे अनेक दावे केले आहेत; पण ते खरे ठरल्याचे काही दिसलेले नाही!