Video:  ही भन्नाट सायकल बघितली का ? चाकांवर नाहीतर ब्लेडवर चालणार  सायकल खास ‘या’ कारणासाठी  बनवलीय

द क्यू नावाच्या एका प्रोडक्ट इंजिनियरने एक सायकल बनविली असून त्याची ही सायकल एकदम भन्नाट पण तितकीच खतरनाक आहे. या सायकलीचे वैशिष्टय म्हणजे ही सायकल चाकांवर नाहीतर ब्लेडवर चालते. वाटले ना आश्चर्य?..

    द क्यू नावाच्या एका प्रोडक्ट इंजिनियरने एक सायकल बनविली असून त्याची ही सायकल एकदम भन्नाट पण तितकीच खतरनाक आहे. या सायकलीचे वैशिष्टय म्हणजे ही सायकल चाकांवर नाहीतर ब्लेडवर चालते. वाटले ना आश्चर्य?.. ब्लेडवर चालणारी सायकल खास बर्फावर चालवता यावी यासाठी तयार करण्यात आली आहे. हिवाळ्यामध्ये सायकल प्रेमींसमोर असणारं सर्वात मोठं आव्हान म्हणजे बर्फ आणि गोठलेली तलावं. जगातील अनेक ठिकाणी शून्याच्या खाली पारा गेल्यानंतर सायकल चालवणं हे सायकल प्रेमींसाठी मोठं टास्क असतं. अनेकदा या काळामध्ये सायकल प्रेमी इतर गोष्टींमध्ये मन रमवतात. मात्र. या पठ्याने बर्फात सायकल चालवता यावी म्हणून चक्क सायकलच्या चाकांच्या जागी गोलाकार ब्लेड लावलेत.

    सायकलचे नाव ‘आइससायकल’

    या तरुणाने आपल्या सायकलची चाकं काढून त्याजागी स्टीलच्या मोठ्या डिस्क लावल्या आहेत. या डिस्कच्या कड्या त्रिकोणी कापून त्यांना ब्लेडसारखा आकार देत पॉलिश केलं आहे. या डिस्क केवळ ब्लेडसारख्या दिसत नाही तर त्यांना धार करण्यात आल्याने त्या एखाद्या कटरच्या ब्लेडप्रमाणेच काम करतात. पहिल्यांदा तो या डिस्क लावून गोठलेल्या तलावावर सायकल चालावायला गेला तेव्हा ब्लेडने बर्फाचा पृष्ठभाग कापून निघाला आणि सायकल चावणं त्याला जमलं नाही. त्यानंतर त्याने तंत्रज्ञानाचा वापर करुन या ब्लेडच्या बाहेरील बाजूस धातूनची आणखीन एक पट्टी लवली आणि यावेळी त्याला यश आलं.त्याने या सायकलचे नाव आइससायकल ठेवले असून या सायकलचा व्हिडिओ युट्यूबवर पोस्ट केला. सध्या या पोस्ट ला २ कोटी व्युज अवघ्या दोन दिवसांत मिळाले आहेत