जगासमोर पहिल्यांदाच आले काबा येथील काला पत्थरचे अद्भुत फोटो

जगभरातील मुस्लिम समाजासाठी मक्का हे आध्यात्मिक केंद्र आहे. मुस्लीम परिवारात एखाद्याचा जन्म झाला, तर त्याने जन्मात एकदा तरी हज यात्रा करायलाच हवी, अशी मुस्लीम समाजात श्रद्धा आहे. मुस्लिमांचे पवित्र तिर्थक्षेत्र असलेल्या काबा येथे येऊन हज यात्री परिक्रमा करतात, आणि त्या प्रवासात काबाच्या पूर्वेकेडे असलेल्या या काला पत्थरचे चुंबन घेतात. हा ब्लॅक स्टोन दिसायला हलान असला तरी त्याचे महत्त्व फार मोठे मानले जाते. हा ब्लॅच स्टोन चारही बाजूंनी चांदीच्या फ्रेममध्ये ठेवण्यात आला आहे.

    रियाद : मुस्लिमांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या मक्का येथील प्राचिन ब्लॅक स्टोन (काला पत्थर)चे अद्भुत फोटो जगासमोर आणले आहेत. अल-हजर अल-असवाद म्हणजेच काला पत्थरचे हे फोटो ४९ हजार मेहापिक्सलचे आहेत. सौदी अरबमधील शाही मशिद आणि पैगंबर मशिदीकडून हे फोटो जारी करण्यात आले आहेत. हे फोटो काढण्यासाठी आणि त्यानंतर प्रोसेसिंगसाठी सुमारे ५० तासांचा वेळ लागला.

    या काळात सुमारे १०५० फोटो काढण्यात आले, या प्रत्येक फोटोची साईझ ही १६० गिगा बाईट एवढी होती. काला पत्थरचे फोटो काढण्यासाठी सुमारे सात तासांचा कालावधी लागला. हे फोटो आत्तापर्यंत कधीही प्रकाशित झाले नव्हते, त्यामुळे ते महत्त्वपूरण असल्याची प्रतिक्रिया ऑक्सफोर्ड विद्यापीठात इस्लामिक अध्ययनाचे संशोधन करणाऱ्या अफिरी अल अकिती यांनी दिली आहे. हे फोटो पाहिल्यावर हा काला पत्थर प्रत्यक्षात काळा नसल्याचे वाटते असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पहिल्यांदाच या ब्लॅक स्टोनच्या प्रत्येक बाजूला मोठे करुन त्याचा डिजिटल फोटो काढण्यात आला आहे.

    या ब्लॅक स्टोन धार्मिक महत्त्व

    जगभरातील मुस्लिम समाजासाठी मक्का हे आध्यात्मिक केंद्र आहे. मुस्लीम परिवारात एखाद्याचा जन्म झाला, तर त्याने जन्मात एकदा तरी हज यात्रा करायलाच हवी, अशी मुस्लीम समाजात श्रद्धा आहे. मुस्लिमांचे पवित्र तिर्थक्षेत्र असलेल्या काबा येथे येऊन हज यात्री परिक्रमा करतात, आणि त्या प्रवासात काबाच्या पूर्वेकेडे असलेल्या या काला पत्थरचे चुंबन घेतात. हा ब्लॅक स्टोन दिसायला हलान असला तरी त्याचे महत्त्व फार मोठे मानले जाते. हा ब्लॅच स्टोन चारही बाजूंनी चांदीच्या फ्रेममध्ये ठेवण्यात आला आहे.

    हा ब्लॅक स्टोन म्हणजे जमिनीवर आलेला धूमकेतू असल्याचे सांगण्यात येते, तर काही जण हा चंद्राचा तुकडा असल्याचेही मानतात. महत्त्वाचे म्हणजे या काला पत्थरला सर्वात पवित्र मानण्यात येते, मात्र काला पत्थरचा उल्लेख कुराणात मात्र नाही. मोहम्मद पैगंबर यांच्यानंतर हा काला पत्थर अस्तित्वात आल्याची धारणा आहे. हदीसमध्ये या ब्लॅक स्टोनचा उल्लेख करण्यात आलेला आहे. अनेक ठिकाणी हा काला पत्थर जिवंत असल्याचा उल्लेखही आढळतो. हज यात्रेला जाणाऱा प्रत्येक जण या ब्लॅक स्टोनचे चुंबन घेऊन इश्वराचे आभार मानतो.