ॲमेझोनचे संस्थापक जेफ बेझोस यांची अंतराळ सफर आज ; पहा त्यांच्या रॉकेट कॅप्सूलचे Exclusive फोटो

  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत अव्वल स्थानी असलेले आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आज अंतराळ प्रवास करणार आहेत. ‘स्पेसफ्लाइट’ कंपनी ब्लू ओरिजिन या त्यांच्या स्वतःच्या कंपनीतर्फ़े ते हा प्रवास करणार आहेत. पहिल्या मानवी अंतराळ प्रवासासाठी ते पूर्णपणे तयार आहे. हे विमान जेफ बेझोससह चार प्रवासी घेऊन जाईल, जे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १०० किमी वर, कार्मन लाइनला प्रवास करून सुरक्षितपणे परत येईल. संपूर्ण फ्लाइटची वेळ १०-१२ मिनिटे असेल.

  असे असेल बेझोस यांचे रॉकेट कॅप्सूल
  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे त्यांचे बालपणीचे स्वप्न साकार करण्यासाठी आज अंतराळाच्या प्रवासावर जाणार आहे.बेजोस यांच्यासोबत इतर तिघे असतील. मिळालेल्या माहितीनुसार, बेजोस यांची टीम मागच्या आठवड्यात अंतराळात गेलेल्या रिचर्ड ब्रेनसन यांच्यापेक्षाही पुढे जाईल.त्या रॉकेटमध्ये जेफ बेजोससह त्यांचे भाऊ मार्क, नीदरलँडमधील १८ वर्षीय ओलिवर डेमन आणि ८२ वर्षीय महिला वेली फंक असतील.पाच मजली इमारतीइतके उंच असलेल्या न्यू शेपर्ड रॉकेटला सहा जणांना घेऊन अंतराळात जाण्यासाठी तयार करण्यात आले आहे.हे रॉकेट प्रवाशांना जवळपास ३४०,००० फुट उंचीवर घेऊन जाईल. रॉकेटमधून वर गेल्यानंतर काही काळासाठी प्रवाशांना मायक्रोग्रॅविटीचरा अनुभव घेता येईल.त्या उंचीवर गेल्यावर संपूर्ण पृथ्वी पाहता येईल. बेजोस यांचा अंतराळ प्रवास भारती वेळेनुसार, सायंकाळी ५ वाजता सुरू होईल.


  असा असेल बेझोस यांचा प्रवास

  जेफ बेजोस यांनी ब्ल्यू ओरिजिन नावाची स्पेस कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून जेफ बेजोस यांनी अंतराळ पर्यटनाची घोषणा केली होती.ब्लू ओरिजिन आपले न्यू शेपर्ड रॉकेट आणि कॅप्सूलसह आपला पहिला क्रू स्पेसलाइट लाँच करणार आहे. हे अंतराळ आज २० जुलै रोजी उड्डाण करणार आहे. ब्लू ओरिजिनने या अभियानाला प्रथम मानवनिर्मित उड्डाण म्हटले आहे. न्यू शेपर्ड रॉकेटचे हे एकूण १६ वे उड्डाण असेल. तथापि, अंतराळवीरांसह न्यू शेपर्ड रॉकेटचे हे पहिले उड्डाण असेल. हे अभियान अंतराळ पर्यटन कंपनीसाठी मैलाचा दगड ठरू शकते. उद्योगपती जेफ बेझोस यांच्यासह अन्य तीन जण आज सकाळी ९ वाजता (अमेरिकन वेळेनुसार )टेक्सास जवळ कंपनीच्या प्रक्षेपण ठिकाणावरून प्रस्थान करतील.

  कधी आणि कसे पाहिले जाऊ शकते उड्डाण?
  पीबीएनएस(PBNS)च्या वृत्तानुसार, न्यू शेपर्ड यांचे हे रोमांचक उड्डाण आज BlueOrigin.com तसेच ProfoundSpace.org वर सकाळी ७.३० वाजता प्रसारीत केले जाईल. लिफ्टऑफ सकाळी ९ वाजता अपेक्षित आहे, परंतु हवामान किंवा तांत्रिक समस्यांमुळे ते बदलले जाऊ शकते. सामान्यत: न्यू शेपर्ड कर्मन लाइनपासून ६२ मैल (१०० किमी) वर उडते, ही एक काल्पनिक रेषा आहे ज्यात अवकाशाची मर्यादा म्हणून ओळखतात. रॉकेट स्वयंचलितपणे त्याच्या प्रक्षेपण साईटवर आणि जमिनीवर परत येईल आणि क्रू कॅप्सूल पॅराशूटच्या मदतीने खाली उतरेल.