India china and america

अमेरिकेत संरक्षण धोरण विधेयक मंजूर(america defence policy bill) करण्यात आलं आहे. या विधेयकात अमेरिकेने भारत-चीनमधील वास्तविक नियंत्रण रेषेजवळ चीनकडून भारताविरोधात सुरु असलेल्या आक्रमकतेचाही समावेश करण्यात आला आहे.

अमेरिकन काँग्रेसमधील प्रतिनिधी सभा आणि सिनेटने मंगळवारी राष्ट्रीय संरक्षण प्राधिकरण अधिनियम (एनडीएए) मंजूर केलं. या विधेयकात चीनी सरकारकडून एलएसीजवळ भारताविरोधात सुरु असलेली आपल्या सैन्याची आक्रमकता संपवण्याचा आग्रह धरण्यात आला आहे.

चीन आणि भारतादरम्यान यावर्षी मे महिन्यापासून पूर्व लडाखमध्ये  नियंत्रण रेषेजवळ संघर्ष सुरु आहे. दोन्ही देशांदरम्यान या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी विविध चर्चा झाल्या आहेत. मात्र निर्णय झालेला नाही.

अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये संरक्षण धोरण विधेयकात या तरतुदीचा मसुदा मांडला होता. अमेरिकेच्या संरक्षण विधेयकात हा मुद्दा असणे म्हणजे भारताला अमेरिकेचं मजबूत समर्थन असल्याचे द्योतक आहे. हा चीनसाठी खास संदेश आहे.