covaxin

कोव्हॅक्सिन (Covaxin Vaccine) लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव अमेरिकन अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) देण्यात आला होता. मात्र FDA ने हा प्रस्ताव नामंजूर केला आहे.

    भारतात सध्या कोविशिल्ड(COVISHIELD) आणि कोव्हॅक्सिन(COVAXIN )अशा दोन लशीचं उत्पादन घेतलं जात आहे. यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (SII) याठिकाणी उत्पादन होतं असलेल्या कोविशिल्ड लशीला जगभरातून मोठी मागणी आहे. मात्र हैदराबाद याठिकाणी भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीकडून उत्पादित केली जाणाऱ्या कोव्हॅक्सिन लशीच्या (Covaxin Vaccine) आपत्कालीन वापरासाठी अमेरिकेनं नकार (Denies emergency use) दिला आहे.

    कोव्हॅक्सिन (Covaxin Vaccine) लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव अमेरिकन अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) देण्यात आला होता. मात्र FDA ने हा प्रस्ताव नामंजूर केला आहे.

    कोव्हॅक्सिन लशीच्या वापराला परवानगी मिळवण्यासाठी भारत बायोटेकची अमेरिकतील सहकारी कंपनी ओक्यूजेन आयएनसी बायोलॉजिक्स लायसन्सकडे अर्ज करणार आहे. ओक्यूजेन आयएनसी ही भारत बायोटेकची अमेरिकेतील सहकारी कंपनी आहे. या दोन्ही कंपन्या मिळून हैदराबाद याठिकाणी लशीचं उत्पादन घेतं आहेत. दरम्यान भारत बायोटेकने अमेरिकेतील भागीदार ऑक्यूजेन कंपनीच्या माध्यमातून ‘एफडीए’कडे कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली होती. मात्र ‘एफडीए’ने कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली नाही.

    ‘एफडीए’ कोव्हॅक्सिन लशीचं आणखी एकदा परीक्षण करण्यास सांगितलं आहे. यानंतरच अमेरिकेत पूर्ण वापरासाठी मंजुरी मागितली जाईल, असे ऑक्युजेनकडून सांगण्यात आलं आहे. आपत्कालीन वापराच्या परवानगीला नकार देताना अमेरिकेच्या एफडीने एक वेगळा मार्ग सुचवला आहे. त्यामुळे आता भारत बायोटेकची अमेरिकेतील सहकारी कंपनी ऑक्युजेन एफडीएच्या सल्ल्यानुसार बीएलएकडे अर्ज दाखल करणार आहे.या संस्थेकडून लशीच्या वापराला मंजुरी देण्यात येते. त्यामुळे पुढील आणखी काही काळ भारत बायोटेकला मंजुरीसाठी वाट पाहावी लागणार आहे.