कोरोनाची दहशत – ‘लवकर भारत सोडा आणि मायदेशी परत या’, अमेरिकेतल्या सरकारकडून अमेरिकन नागरिकांना सूचना

अमेरिका सरकारने (american government advise to Americans) आपल्या नागरिकांनी कोरोनाच्या संकटात शक्य तितक्या लवकर भारत सोडण्यास सांगितलं आहे. अमेरिकेकडून यासंबंधी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

    भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये(corona second wave) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.  आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. भारतातील ही परिस्थिती पाहता अमेरिकेने(american government invited americans to come back from India) आपल्या नागरिकांना तात्काळ आपल्या देशात परत येण्याचा सल्ला दिला आहे.

    अमेरिका सरकारने आपल्या नागरिकांनी कोरोनाच्या संकटात शक्य तितक्या लवकर भारत सोडण्यास सांगितलं आहे. अमेरिकेकडून यासंबंधी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अमेरिकन नागरिकांनी भारतात जाऊ नका. तसेच भारतात असलेल्या अमेरिकन लोकांनी लवकरात लवकर भारत सोडा असं सांगण्यात आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे योग्य असल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये सध्या १४ विमानं सुरु आहेत. याशिवाय युरोपमधून जोडली जाणारी सेवा आहे.

    भारतातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ८३ लाख ७६ हजार ५२४ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ४ हजार ८३२ इतकी झाली आहे.

    याआधी ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी आणली आहे.