An earthquake in Indonesia has killed at least seven people when a building wall collapsed; Patients and staff were trapped under the pile

इंडोनेशिया भूकंपाच्या धक्क्याने इमारतीची भिंत कोसळली आहे. रात्री एकच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामध्ये एका मोठ्या रुग्णालयाची इमारत कोसळली असून त्याखाली अनेक रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर, भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे.

इंडोनेशिया : इंडोनेशिया भूकंपाच्या धक्क्याने इमारतीची भिंत कोसळली आहे. रात्री एकच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामध्ये एका मोठ्या रुग्णालयाची इमारत कोसळली असून त्याखाली अनेक रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर, भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे.

या भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल इतकी होती. सुलावेसी बेटावरील रुग्णालयाची इमारत या भूकंपामध्ये कोसळली आहे. मामुजू शहरामध्ये ही दूर्घटना घडली आहे.  या इमारतीच्या ढीगाऱ्याखाली रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचारी अडकले आहेत.

या भूकंपाचा केंद्रबिंदू जमीनीखाली १० किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ असणाऱ्या सुलावेसी शहराला सर्वाधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

६० हून अधिक घरांची पडझड झाली आहे. सात सेकंदांसाठी हा भूकंपाचा झटका जाणवला. या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. मात्र समुद्रकिनाऱ्यावर सतर्क राहण्याचे आदेश जारी करण्यात आलेत. गुरुवारीही इंडोनेशियातील काही ठिकाणी भूकंपाचे मध्यम स्वरुपाचे झटके जाणवले होते.