कोरोनासोबतच आणखी एक संकट; …म्हणून ऑस्ट्रेलियाने भारताकडे मागीतले विष

संपूर्ण जग कोरोना विषाणूविरोधात लढा देत असतानाच ऑस्ट्रेलियात मात्र उंदरांनी धुमाकूळ घातला आहे. हे उंदरं केवळ शेतपिकांचेच नव्हे तर आता घरामध्येही घुसखोरी करून खाद्यपदार्थांचा फडशा पाडत आहेत. उंदरांच्या या धुमाकुळामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. उंदरांनी पिकांचा फडशा पाडल्यामुळे शेतकरीही त्रस्त झाले आहेत. उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने उपाययोजना शोधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मलमुत्र आणि उंदरांच्या मृत्युमुळे प्लेगचेही संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

    सिडनी : संपूर्ण जग कोरोना विषाणूविरोधात लढा देत असतानाच ऑस्ट्रेलियात मात्र उंदरांनी धुमाकूळ घातला आहे. हे उंदरं केवळ शेतपिकांचेच नव्हे तर आता घरामध्येही घुसखोरी करून खाद्यपदार्थांचा फडशा पाडत आहेत. उंदरांच्या या धुमाकुळामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. उंदरांनी पिकांचा फडशा पाडल्यामुळे शेतकरीही त्रस्त झाले आहेत. उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने उपाययोजना शोधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मलमुत्र आणि उंदरांच्या मृत्युमुळे प्लेगचेही संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

    भारताला मागितले 5000 लीटर विष

    उंदरांचा नाश करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारताकडे 5000 लीटर प्रतिबंधित ब्रोमेडिओलिनची मागणी केली आहे. दरम्यान स्थानिक सरकारने आपातकालीन परिस्थितीत अद्याप या विषाचा वापर शेतजमिनीवर करण्यास अजून तरी मंजुरी दिली नसल्याचे समजते. उंदरांचा हा धुमाकूळ कायम राहिला तर ग्रामीण आणि न्यू साऊथ वेल्समध्ये आर्थिक व सामाजिक संकटही उद्भवू शकते, अशी चर्चा आहे.

    नष्ट करण्याचे आव्हान

    उंदरांच्या या धुमाकुळावर कृषीमंत्री अॅडम मार्शल यांनी चिंता व्यक्त केली. उन्हाळा संपेपर्यंत उंदरांची संख्या कमी झाली नाही तर अनेक समस्या उद्भवतील, असे ते म्हणाले. ग्रामीण भाग व न्यू साऊथ वेल्समध्ये उंदरांच्या वाढत्या संख्येमुळे आर्थिक व सामाजिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

    घराला लागली आग

    काही दिवसांपूर्वी उंदरांनी वीजेची तार कुरतडल्यामुळे एका घराला आग लागली होती. ब्रूस बार्न्स नामक व्यक्तीने सांगितले की आम्ही अत्यंत श्रमाने पीक घेत आहोत परंतु उंदरांमुळे पीकच नष्ट होण्याची शक्यता आहे. तसे घडले तर आमच्या मेहनतीवरही पाणी फेरले जाईल, असे ते म्हणाले.

    अनेक जण आजारी

    प्रत्येक ठिकाणी उंदरांचा वावर वाढला असून ते घर, वाहने, फर्निचर, छत, शाळा आणि रुग्णालयातही आढळून आले आहेत. या उंदरांनी राज्यातील अनेक कृषी व ग्रामीण भागच नष्ट केला आहे. सर्वाधिक लोकांना तर दुर्गंधीचाही सामना करावा लागत आहे. परिसरात उंदरांचे मलमूत्र आणि मृत उंदरांमुळे दुर्गंधी वाढू लागली असून अनेक जण आजारी पडले आहेत.