Apology to those who vandalized the temple; Generosity of Hindus in Pakistan

'जिग्रा' नावाच्या या अनौपचारिक बैठकीत आरोपींनी या मंदिरावरील हल्ल्याबद्दल, तसेच सन 1997मध्ये अशीच घटना घडल्याबद्दल माफी मागितली. त्यानंतर देशाच्या राज्यघटनेनुसार हिंदूंचे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात येईल, असे आश्वासन येथील मुस्लिम धर्माच्या नेत्यांनी यावेळी दिले.

    पेशावर : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथील हिंदू समुदायाने या प्रांतातील शतकभरापूर्वीच्या हिंदू मंदिराची तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्या जमावाला माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा वाद सोडविण्यासाठी स्थानिक धार्मिक नेते आणि हिंदू समुदायाच्या सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

    ‘जिग्रा’ नावाच्या या अनौपचारिक बैठकीत आरोपींनी या मंदिरावरील हल्ल्याबद्दल, तसेच सन 1997मध्ये अशीच घटना घडल्याबद्दल माफी मागितली. त्यानंतर देशाच्या राज्यघटनेनुसार हिंदूंचे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात येईल, असे आश्वासन येथील मुस्लिम धर्माच्या नेत्यांनी यावेळी दिले.

    तसेच या बैठकीत मान्य करण्यात आलेल्या कराराची प्रत सर्वोच्च न्यायालयात सादर केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी 30 डिसेंबर रोजी स्थानिक मौलवी आणि जमात-उलेमा-ए-इस्लाम या कट्टरपंथी पक्षाच्या सदस्यांच्या नेतृत्वाखाली जमावाने खैबर पख्तूनख्वा प्रांतामधील कारक जिल्ह्यातील तारी गावात शतकभरापूर्वीच्या मंदिराची आणि तिथे असलेल्या परमहंसजी महाराज यांच्या समाधीची तोडफोड केली, तसेच जाळपोळही करण्यात आली होती.