आयफोन वॉटरप्रूफ असल्याचा दावा महागात ; अॅपलला ८८ कोटींचा दंड

रोम : अमेरिकेची दिग्गज स्मार्टफोन कंपनीचा दावा खोटा ठरला असून दावेच फोल ठरल्यामुळे या कंपनीला १० दशलक्ष युरो म्हणजेच जवळपास ८८ कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. इटलीच्या अँटी ट्रस्ट अॅथॉरिटी एजीसीएमने अॅपलवर हा दंड ठोठावला आहे. आयफोनच्या जल प्रतिकार क्षमतेबाबत दिशाभूल करणारे किंवा खोटे दावे केल्याबद्दल कंपनीला दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधीही कंपनीवर जुन्या आयफोनची गती मंद केल्याचा ठपका ठेवत दंड ठोठावण्यात आला होता.

-ग्राहकांची फसवणूक केल्याचा ठपका
इटलीच्या अँटी ट्रस्ट अॅथॉरिटीने म्हटले आहे की, कंपनीने आयफोन वॉटरप्रूफ असल्याबाबत बराच प्रचार केला होता. परंतु कंपनीच्या अस्वीकरणात फोनच्या द्रवपदार्थामुळे नुकसान झाल्यास वॉरंटी दिली जाणार नाही असे नमूद केले होते, याकडेही लक्ष वेधले. तसेच, कोणत्या विशिष्ट परिस्थितीत आयफोनचे हे फिचर काम करेल हे मात्र स्पष्ट करण्यात आले नव्हते. ग्राहकांसाठी हा एक प्रकारचा फसवणूक आहे. सध्या अॅपलकडून यासंदर्भात कोणतेही निवेदन देण्यात आले नाही.

-केला होता दावा
इटलीच्या प्रतिसपर्धा प्राधिकरणाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की प्रीमियम स्मार्टफोन बनवणार्‍या कंपनीने त्यांच्या आयफोनला वॉटर रेसिस्टन्स किंवा वॉटरप्रूफ असल्याची जाहिरात केली, मात्र हे कोणत्या परिस्थितीत लागू होते, याविषयी संगितले नाही. अॅपच्या वॉटरप्रूफ असल्याच्या दाव्यावर टीका करतानाच अॅथॉरिटीने हे दावे काही विशिष्ट परिस्थितीतच खरे आहेत असेही नमूद केले. उल्लेखनीय असे की अॅपलने असा दावा केला आहे की त्याचे वेगवेगळे आयफोन मॉडेल्स चार मीटरपर्यंत खोल पाण्यात ३० मिनिटे वॉटरप्रूफ आहेत. शुद्ध व स्थिर पाण्यात हा फोन टिकू शकतो इतर पाण्यात जर फोन पडला तर खराब होऊ शकतो.

-३४ राज्यांनी सुरू केली चौकशी
तथापि, अॅपलने केलेला वॉटरप्रूफचा दावा अनेकांच्या पचनी पडलेला नाही. अमेरिकेसह जवळपास ३४ राज्यांनी अॅपलविरोधात चौकशी सुरू करण्यासह कोर्टात जाण्याचाही निर्णय घेतला आहे. कंपनीद्वारे लोकांना नवे आणि महागडे फोन खरेदी करण्यासाठी बाध्य केले जात आहे असेही अॅथॉरिटीने म्हटले आहे. कंपनीचे नवे फोन लोकांनी खरेदी करावे यासाठी जुने फोन अपडेटच्या नावावर स्लो केले जात आहे असाही आरोप आहे.

-यापूर्वीही ठोठावला होता दंड
अ‍ॅपल आयफोन मॉडेल्सना यापूर्वी दंडही करण्यात आला आहे. आयफोनच्या मंदीमुळे अ‍ॅपल कंपनीला ११३ दशलक्ष डॉलर्स इतका दंड आकारण्यात आला, जो सुमारे ८.३ अब्ज डॉलर्स आहे. अहवालानुसार २०१६ मध्ये अ‍ॅपलने आयफोनसाठी एक अपडेट जारी केला होता, ज्यामुळे जुने आयफोन कमी झाले होते. कंपनीने आपल्या वापरकर्त्यांना याविषयी कोणतीही माहिती दिली नव्हती.