ashraf ghani

अशरफ घनी यांच्या भावाने तालिबानशी हातमिळवणी(Ashraf Ghani`s Brother Supported Taliban) केल्याचे वृत्त समोर आले आहे.

    तालिबानने(Taliban In Afghanistan) अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी(President Ashraf Ghani) देश सोडून पळून गेले. अशातच अशरफ घनी यांच्या भावाने तालिबानशी हातमिळवणी(Ashraf Ghani`s Brother Supported Taliban) केल्याचे वृत्त समोर आले आहे. हशमत गनी अहमदजई यांनी तालिबानला समर्थन देत असल्याचे जाहीर केले आहे. कुचिसच्या ग्रँड कॉन्सिलचे प्रमुख हशमत गनी अहमदडई याने तालिबान नेते खलील-उर-रहमान आणि धार्मिक नेते मुफ्ती महमूद झाकीर यांच्या उपस्थितीत समर्थनाची घोषणा केली. हशमत गनी अफगाणिस्तानातील प्रभावशाली नेते असल्याने तालिबानला त्यांचा फायदा होणार आहे.

    अशरफ घनी यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती असताना त्यांच्या भावाला आणि एका अमेरिकन कंत्राटदाराला खनिज प्रक्रिया परवानगी मिळवण्यास मदत केल्याचे म्हटले जाते. त्यांच्याकडे अमेरिका, दुबई, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये कोट्यवधी किमतीची जमीन आहे.

    दरम्यान, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी पैशांच्या अनेक बॅगा घेऊन देशातून पळ काढल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत असं घनी यांनी म्हटलं आहे. सोमवारी काबूलमधील रशियन दुतावासाने घनी हे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आपल्या सोबत घेऊन गेल्याचा आरोप केला होता. कार आणि हेलिकॉप्टरमधून घनी पैसे घेऊन देशातून पसार झाल्याचा दावा करण्यात आला होता.

    राष्ट्रपती अशरफ घनी आपल्या कुटुंबासह अबू धाबीमध्ये आहेत. मानवतेच्या आधारावर युएई राष्ट्रपती अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबाला आश्रय देत आहे, असं यूएईने म्हटलं आहे.