मागितले फ्राइड चिकन अन मिळाला ‘तळलेला टॉवेल’; महिलेला Online Food Delivery कंपनीचा आला धक्कादायक अनुभव

पेरेझने फेसबुकवर याचे फोटो तसेच व्हिडिओही शेअर केले आहेत. त्यातून दिसून येते की, ती चिकनऐवजी, टॉवेल पाठवलेला आहे. या पोस्टमध्ये ती विचारते, ‘चिकनच्या पिठात टॉवेल कसा काय येऊ शकतो? आणि आलाच तर कोणी तो तळू कसा शकतो?’ या पोस्टवर अनेक लोकांनी तिला कंपनीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे.

    सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात अनेक जण वस्तूंसोबत अन्नपदार्थही ऑनलाइन ऑर्डर करत आहेत. ज्या प्रमाणे मागवलेल्या वस्तू ऐवजी भलतंच ग्राहकाच्या हातात पडून जी फसगत होते तीमात्र फसगत अन्नपदार्थात होइल असे कोणाला वाटत नाही. मात्र अशी फसगत ऑनलाईन मागवलेल्या पदार्थात झालेली आहे. फिलीपिन्समधील एका महिलेने आपल्या मुलासाठी फ्राईड चिकनची ऑर्डर दिली होती, परंतु जेव्हा तिला पार्सल देण्यात आले तेव्हा लक्षात आले की, चिकनच्या एवजी हॉटेलने चक्क फ्राईड टॉवेल दिला आहे. जेव्हा महिलेने चिकन म्हणून तो कापण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला समजले की, ते चिकन नसून टॉवेल आहे.

    फेसबुकवर सांगितले घडल्या प्रकाराबद्दल
    अलीक पेरेझ नावाच्या महिलेने फेसबुकवर या घटनेबाबत तपशीलवार माहिती दिली आहे. तिने जॉलीबी या प्रसिद्ध रेस्टॉरंटकडे या पार्सलची ऑर्डर दिली होती. आपल्या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, ‘मी माझ्या मुलासाठी चिकनची ऑर्डर दिली होती. ऑर्डर आल्यावर मी चिकन कापण्याचा प्रयत्न करू लागले, मात्र मला ते जरा कठीण वाटले. त्यानंतर मी ते हाताने तोडण्याचा प्रयत्न केला आणि दिसून आले की त्यामध्ये तळलेला टॉवेल आहे. समोरील दृश्य पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला.’

    पेरेझने फेसबुकवर याचे फोटो तसेच व्हिडिओही शेअर केले आहेत. त्यातून दिसून येते की, ती चिकनऐवजी, टॉवेल पाठवलेला आहे. या पोस्टमध्ये ती विचारते, ‘चिकनच्या पिठात टॉवेल कसा काय येऊ शकतो? आणि आलाच तर कोणी तो तळू कसा शकतो?’ या पोस्टवर अनेक लोकांनी तिला कंपनीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे.

    ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनी आपले रेस्टॉरंट तात्पुरते बंद करेल, असे फास्ट फूड चेन जॉलीबीने सांगितले आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर रेस्टॉरंट त्या दिवसासाठी बंद केले गेले. जॉलीबी फूड्स कॉर्पने सांगितले की, घडलेल्या प्रकारची कसून चौकशी करण्यात येईल आणि कामगारांना ताकीद दिली जाईल की अशा घटनेची पुनरावृत्ती कधी होणार नाही. घडल्या प्रकाराबाबत पेरेझचा नुकसान भरपाई मिळेल का या बाबत अजून काही माहिती मिळाली नाही