attack on temple at rawalpindi

रावळपिंडीच्या जुना किल्ला परिसरात एक मंदिर असूूून या मंदिराच्या नुतनीकरणाचं काम सुरू आहे. शनिवारी रात्री १० ते १५ जणांनी या मंदिरावर हल्ला केला. (attackon 100 year old temple of rawalpindi) या मंदिरातील दरवाजा आणि पायऱ्यांची नासधूस करण्यात आली आहे.

    रावळपिंडी : होळीच्या(holi) सणाला गालबोट लागले आहे. पाकिस्तानातील रावळपिंडीमधील (rawalpindi temple attack) १०० वर्षांहून जुन्या मंदिरावर अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, रावळपिंडीच्या जुना किल्ला परिसरात हे मंदिर असूूून या मंदिराच्या नुतनीकरणाचं काम सुरू आहे. शनिवारी रात्री १० ते १५ जणांनी या मंदिरावर हल्ला केला. या मंदिरातील दरवाजा आणि पायऱ्यांची नासधूस करण्यात आली आहे.

    या भागातील उत्तर विभागाचे सुरक्षा अधिकारी सय्यद रझा अब्बास झैदी यांनी या प्रकरणात रावळपिंडीमधील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

    या मंदिरासमोर अतिक्रमण करण्यात आलं होतं. हे अतिक्रमण २४ मार्च रोजी हटवण्यात आलं होतं.  या मंदिराचं पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी झैदी यांनी केली आहे.

    यापूर्वी या मंदिराच्या परिसराला अतिक्रमणाचा विळखा पडला होता. जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने हे अतिक्रमण हटवलं होतं. मंदिराची अतिक्रमणाच्या विळख्यातून सुटका केल्यानंतर याच्या नुतनीकरणाच्या कामाने  वेग घेतला.रावळपिंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणल्याचं सांगितलं.