पंजशीर खोऱ्यात तालिबान्यांचा युद्धसंग्राम सुरू, नॉदर्न अलायन्सच्या सैनिकांना मारल्याचा दावा

एकीकडे तालिबान जगासमोर शांतीपूर्ण भूमिकेच्या गोष्टी करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्यात तालिबान्यांनी घुसखोरी केल्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

    अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर आता पंजशीर खोऱ्यात युद्धसंग्राम सुरू केला आहे. एकीकडे तालिबान जगासमोर शांतीपूर्ण भूमिकेच्या गोष्टी करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्यात तालिबान्यांनी घुसखोरी केल्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

    स्थानिक पत्रकार नातिक मालिदजादाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्याच्या सीमेवरील गुलबहार परिसरात तालिबानी आणि नॉदर्न अलायन्समध्ये चकमक झाली. इतकंच नव्हे, तर तालिबान्यांनी एक पूल बॉम्बस्फोटानं उडवून देत नॉदर्न अलायन्सची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

    याआधी सोमवारी रात्री देखील तालिबानी आणि नॉदर्न अलायन्समध्ये गोळीबार झाला होता. यामध्ये ७ ते ८ तालिबानी दहशतवादी ठार झाले होते. पंजशीर खोरं अजूनही तालिबानच्या ताब्यात आलेलं नाही. याठिकाणी अहमद मसूदच्या नेतृत्त्वाखालील नॉदर्न अलायन्स तालिबान्यांना खडतर आव्हान देत असल्याचं समजलं जात आहे.