अफगाणिस्तानमध्ये पुन्हा सरकार स्थापन्याचे प्रयत्न फोल

विशेष म्हणजे अफगाणिस्तानवर ताबा मिळवून तालिबानला आता २० दिवस उलटले आहेत. तरीही सरकार स्थापना होऊ शकलेली नाही. एक सर्व घटकांना सोबत घेऊन सरकार बनवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळेच सरकार स्थापनेला वेळ लागत असल्याचा दावा तालिबाननं केला आहे.

    काबूल: अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या नेतृत्वात नव्या सरकारची घोषणा पुढच्या आठवड्यात केली जाईल, असं तालिबानच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तानवर ताबा मिळवून तालिबानला आता २० दिवस उलटले आहेत. तरीही सरकार स्थापना होऊ शकलेली नाही. एक सर्व घटकांना सोबत घेऊन सरकार बनवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळेच सरकार स्थापनेला वेळ लागत असल्याचा दावा तालिबाननं केला आहे.

    तालिबानचा  सहसंस्थापक मुल्ला अब्दूल गनी बरादर याच्या नेतृत्वात अफगाणिस्तानमध्ये सरकार अस्तित्वात येईल हे जवळपास निश्चित मानलं जातं आहे. इराणच्या धर्तीवर अफगाण सरकारची रचना असेल अशीही चर्चा आहे. तालिबाननं बंदुकीच्या जोरावर अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. त्याला आता वीस दिवस उलटत आहेत. चीन-रशियासारखे देश सध्या तरी तालिबानच्या पाठीशी उभे आहेत. असं असतानाही तालिबानला सरकार बनवण्यात अडचणी येत आहेत.