‘या’ देशाच्या पंतप्रधानांनी पराभूत होताच ठोकलं संसदेला टाळ

यंदा एप्रिल महिन्यात तिथे निवडणुका झाल्या. त्यात सत्ताधारी पक्षाची हार झाली. फास्ट पार्टीने ही निवडणूक जिंकली आणि नाओमी मताफा (Fiame Naomi Mata'afa) या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. मात्र 22 वर्षं सत्तेवर असलेल्या मॅलिलेगाओई हे आपला पराभव स्वीकारू शकले नाहीत. त्यांना आपला पराभव मान्य नसल्याने त्यांनी चक्क संसदेलाच टाळं ठोकलं. 

    नवी दिल्ली: एखाद्या देशाची सत्ता हाती असेल तर मग बघायलाच नको. याचा प्रत्यय सामोआ (Samoa) या छोट्याशा देशाच्या निवडणुकांनंतर नुकताच आला आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या निवडणुकीत या देशाच्या नागरिकांनी 22 वर्षं या देशाची सत्ता हाती असलेल्या पंतप्रधानांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तसंच, प्रथमच एका महिलेच्या हाती देशाचं सत्ता दिली आहे. मात्र 22 वर्षं घेतलेली सत्तेची ऊब मावळत्या पंतप्रधानांना सोडवत नसल्यामुळे अभूतपूर्व पेच प्रसंग उभा राहिला आहे.

    ह्युमनराइट्स प्रोटेक्शन पार्टी (HRPP) या पक्षाची सामोआवर गेली 40 वर्षं सत्ता आहे. त्यापैकी 22 वर्षं ट्विलाएपा सॅलेले मॅलिलेगाओई (Tuilaepa Sailele Malielegaoi) हे देशाचे पंतप्रधान आहेत.

    यंदा एप्रिल महिन्यात तिथे निवडणुका झाल्या. त्यात सत्ताधारी पक्षाची हार झाली. फास्ट पार्टीने ही निवडणूक जिंकली आणि नाओमी मताफा (Fiame Naomi Mata’afa) या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. मात्र 22 वर्षं सत्तेवर असलेल्या मॅलिलेगाओई हे आपला पराभव स्वीकारू शकले नाहीत. त्यांना आपला पराभव मान्य नसल्याने त्यांनी चक्क संसदेलाच टाळं ठोकलं.