briazilian robber thrown cash on road

ब्राझीलमधील सांता कॅटरिना स्टेटमधील क्रिशूम शहरात दरोडेखोरांच्या टोळीने एक बँक लुटली(robbery in Brazil)आणि तिथून पळ काढला. त्यावेळी त्यांनी लुटलेल्या रकमेपैकी काही पैसे त्यांनी शहरातील रस्त्यावर उधळले. तिथे अनेकांनी पडलेले पैसे गोळा करण्यासाठी गर्दी केली होती.

ब्रासीलिया : ब्राझीलमध्ये(brazil) एक विचित्र प्रकार घडला आहे. ब्राझीलमधील सांता कॅटरिना स्टेटमधील क्रिशूम शहरात दरोडेखोरांच्या टोळीने एक बँक लुटली(robbery in brazil)आणि तिथून पळ काढला. त्यावेळी त्यांनी लुटलेल्या रकमेपैकी काही पैसे त्यांनी शहरातील रस्त्यावर उधळले. तिथे अनेकांनी पडलेले पैसे गोळा करण्यासाठी गर्दी केली होती. त्यानंतर तिथे ट्रॅफिक जाम झालं.  या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.


त्या चोरांनी काळ्या रंगाचे हुडी घालून बँक लुटली. त्यानंतर निघत असताना त्यांनी ६ जणांना बंदी बनवलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेदरम्यान शहरातील विविध भागांमध्ये गोळीबार झाला. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यासह दोन जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, किमान दहा गाड्यांमध्ये ३० गुन्हेगार होते आणि त्यांनी पोलिसांचा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बंद केला होता.

ब्राझिलियन गायक-गीतकार जेल फ्लोरिझेल यांनी ट्विटरवर एक फुटेज शेअर केलं ज्यामध्ये लोक नोटांसाठी धावताना दिसत आहेत. त्यांनी ट्विट केलं आहे की, ‘ब्राझीलच्या क्रिशूमा शहरात झालेल्या मेगालुटीनंतर जमिनीवर पडलेल्या नोटा उचलताना नागरिक. या दु:खद घटनेनंतरही अनेकांचा ख्रिसमस चांगला होईल.’ दरम्यान, शहराचे महापौर क्लासिओ साल्वारो यांनी ट्विटरवरून नागरिकांना घरात राहा आणि सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे.