उत्तर कोरियाचे राष्ट्रपती किम जोंग उन यांनी अमेरिकेसोबत चर्चा आणि वेळप्रसंगी दोन हात करण्यासही सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने उत्तर कोरियाला अण्वस्त्र कार्यक्रम सोडून चर्चा करण्याचे आवाहन केले होते.

    सेऊल : उत्तर कोरियाचे राष्ट्रपती किम जोंग उन यांनी अमेरिकेसोबत चर्चा आणि वेळप्रसंगी दोन हात करण्यासही सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने उत्तर कोरियाला अण्वस्त्र कार्यक्रम सोडून चर्चा करण्याचे आवाहन केले होते.

    किम जोंग आणखी अण्वस्त्रे वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याआधारे अमेरिकेच्या उत्तर कोरियाबाबतच्या धोरणात बदल करू इच्छितात. असे असले तरी किम जोंग अमेरिकेसोबत चर्चा करण्यास तयार आहेत. सत्ताधारी वर्कर्स पक्षाच्या बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या भाषणावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

    याआधी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात बैठक झाली होती. मात्र, त्यांच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही. बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उत्तर कोरियाबाबत अमेरिकेचे काय धोरण असणार याकडेही अनेकांचे लक्ष आहे.

    हे सुद्धा वाचा