T-२० पंतमध्ये मॅचविनर बनण्याची क्षमता ; लक्ष्मणने उधळली स्तुतिसुमने

टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतने जानेवारी महिन्यातील आयसीसी मेन्स प्लेअर ऑफ दी मन्थ पुरस्कारावर आपले नाव कोरल्यानंतर आता भारताचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विन याने फेब्रुवारी महिन्याचा पुरस्कार पटकावला आहे. त्याने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला मागे टाकत हा पुरस्कार पटकावला.

    दिल्ली: टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन रिषभ पंत सध्या जबरदस्त फॉर्मत आहे. त्याने परिपक्वतेने कसोटी मालिकेत फलंदाजी केली. तो टीम इंडियासाठी मॅचविनर बनू शकतो. आम्ही पंतला आयपीएलमध्ये दिल्लीसाठी दबावात्मक स्थितीत मॅच जिंकून देताना पाहिलं आहे. पंतला एकदा सुर गवसला की तो प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला आपल्या खेळीने घाम फोडू शकतो. पंतला इंग्लंड विरुद्धच्या टी २० मालिकेत स्थान देऊन योग्य केले, अशी भविष्यवाणी टीम इंडियाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला. लक्ष्मण स्टार स्पोर्ट्सच्या गेम प्लॅन या विशेष कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळेस तो बोलत होता.
    पंतला त्याच्या एक किंवा दोन डावातील कामगिरीवर जज करु नका. मी फक्त इतकीच आशा करतो की, पंतबाबतचा कोणताही निर्णय हा त्याच्या २ डावातील कामगिरीवरुन घेऊ नका. जर आपण आगामी टी २० वर्ल्ड कपच्या दृष्टीने पाहत असू तर पंतला खेळण्याची संधी द्यायला हवी. त्यामुळे पंतमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. पंतमध्ये सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. तो सामना जिंकून देऊ शकतो”, असंही लक्ष्मणने नमूद केलं.

    cri
    पंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करतोय. पंतने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत निर्णायक भूमिका बजावली. पंतचा या दोन्ही मालिका विजयांमध्ये मोलाचा वाटा राहिला आहे. तसेच पंत२०२१ मध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. पंतने या वर्षात भारताकडून सर्वाधिक ५१५ धावा केल्या आहेत. पंतला गेल्या काही महिन्यांपासून चांगला सूर गवसला आहे. त्यामुळे तो आता इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर टी २० सीरिजसाठी उत्सुक आहे.